सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या ओळीच्या अनुषंगाने दि. ३१ जुलै हा जागतिक वनसंरक्षक दिवस मानला जातो. त्यानिमित्त नागोठण्याजवळील बाळसई येथील माध्यमिक विद्यालय वांगणी येथे ३१ जुलै ते ७ जुलैच्या राज्य शासनाच्या वृक्ष संवर्धन उपक्रमांतर्गत वांगणी हायस्कुल समोरील परिसरामध्ये विविंध झाडाचे स्थानिक शाळा समिती अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
झाडे लावा- झाडे जगवा, पर्यावरणाचा समतोल राखा. असा महत्वपुर्वक संदेश वांगणी हायस्कुलच्या परिसरामध्ये वृक्षलागवड करुन जागतिक वनसंरक्षक दिनानिमित्त देण्यात आला. या वृक्षलागवड कार्यक्रमाला वांगणी हायस्कुलचे स्थानिक शाळा समिती अध्यक्ष मधुकर ठमके, मुख्याध्यापक एल. एल. ठाकरे, शिक्षक टिळक खाडे, विकास म्हात्रे, नरेंद्र पाटील, मनोहर सुतार, भद्रीशेट्टे मँडम, कर्मचारी संदिप भोसले आदि उपस्थित होते.






Be First to Comment