स्व.नगराजशेठ यांच्या जयंती निमित्त भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न
सिटी बेल • उरण • घन:श्याम कडू •
उरणमध्ये कार्यरत असणार्या साई संस्था डोंबिवली संचलित नगराज सी.बी.एस.ई. इंटरनॅशनल स्कूलमध्ये उरणचे शिल्पकार तथा उरण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष स्व.नगराज पुखराज शेठ यांच्या जयंती निमित्ताने तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कोरोनाचे नियन व अटी-शर्थीचे पालन करून तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना प्रचंड प्रतिसाद लाभला. तालुक्यातील विविध शाळातील सुमारे 350 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता.
या स्पर्धेचे आयोजन साई संस्था डोंबिवली याच्या वतीने करण्यात आले होते. उद्घाटन साई संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील याच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून साई संस्था डोंबिवलीच्या कोषाध्यक्ष सौ.पद्मिनी पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, साई संस्थेचे सदस्य मिलिंद ठाकूर सर, नगराजशेठ सीबीएसई स्कूलचे सीईओ रमाकांत गावंडसर, प्राचार्य ज्योती म्हात्रे, इशिका मॅडम, साई, अंकुश जोगळे सर, नितीन गुप्ता, मिता परमार, पालक व विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उरणात सी.बी.एस.ई.स्कूल व्हावे ही नगराज शेठ यांची मोठी इच्छा होती. कारण उरणच्या विकासाचा वेग पहाता येथील विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण मिळण्याची गरज होती. तालुक्यातील विद्यार्थी हे सीबीएसई बोर्डच्या शिक्षणासाठी नेरूळ-वाशी-ठाणे परिसरात जातात त्यांचा अभ्यासाचा वेळ प्रवासातच खर्च होतो शिवाय आर्थिकदृष्ट्या पालकांनाही ते परवडत नाही. त्यामुळे उरणमध्ये ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ते प्रयत्नशील होते.
फार विचार करून त्यांनी ही शैक्षणिक जबाबदारी मोठ्या विश्वासाने साई संस्थेकडे सुपूर्द केली आणि आम्ही ती यशस्वीपणे पार पाडीत आहोत. मात्र आज दुर्दैवाने नागराजशेठ आमच्यात नाहीत ही खंत मनाला टोचत असली तरी त्यांच्या आशीर्वादाने आणि उरणकरांच्या सहकार्याने हे शिवधनुष्य साई संस्था पेलेल असे संस्थेचे अध्यक्ष नरसु पाटील यांनी नगराजशेठ यांच्या जयंती निमित्त सांगितले.
स्वर्गीय नगराजशेठ यांच्या जयंतीचे औचित्य साधत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या चित्रकला स्पर्धेला तालुका पातळीवर चांगला प्रतिसाद ही लाभला. यापुढे तालुका स्तरावर व भविष्यात जिल्हा स्तरावर नगराजशेठ सीबीएसई स्कूलच्या माध्यमातून साई संस्था डोंबिवली निश्चितपणे असे उपक्रम राबवील अशी ग्वाही साई संस्थेच्या वतीने मी देतो असे त्यांनी शेवटी पाटील यांनी सांगितले.

यावेळी साई संस्थेचे विश्वस्त मिलिंद ठाकूर यांनी स्पर्धेचे नियम व आयोजन कशा प्रकारे केले. याबाबत सविस्तर माहिती दिली. शाळेचे सीईओ रमाकांत गावंड सरांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या विद्यालयात उच्च दर्ज्याचे शिक्षण देण्यासाठी उच्च शिक्षीत शिक्षक असतील सोई-सुविधा दिल्या जातील. आपणा सर्वांचे सहकार्य त्यासाठी हवे आहे, उपस्थित पालकानी आपल्या हितचिंतकांना मित्रपरिवाराल शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन केले.
प्रदीप पाटील यांनी नगराजशेठ यांच्या कार्याचा आढावा घेत शाळेच्या निर्मितीच इतिहास सांगितला व उपस्थित स्पर्धकांचे स्वागत केले. यापुढे वेगवेगळ्या स्पर्धा शाळेच्या माध्यमांतून घेण्यात याव्यात व शाळेतून दर्जेदार विद्यार्थी तयार व्हावेत हीच नगराजशेठ यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे ते शेवटी म्हणाले. या स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार असून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषकाचे वितरण करण्यात येईल, अशी माहित शाळेच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.












Be First to Comment