Press "Enter" to skip to content

रेश्माताई ठाकूर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

चिरनेर येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेण, पेन्सिल, कंपास बॉक्स आदी साहित्याचे वाटप

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्माताई शरद ठाकूर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. उरण तालुक्यातील चिरनेर येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेण, पेन्सिल, कंपास बॉक्स आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण राजू मुंबईकर यांनी सरपंच रेश्माताई ठाकूर, उपसरपंच शरद ठाकूर यांच्या सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. विद्यार्थ्यांना साहित्य व जेवण देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.

यावेळी सरपंच रेश्माताई ठाकूर, उपसरपंच शरद ठाकूर,रायगड भूषण राजू मुंबईकर, सुप्रसिद्ध समालोचक प्रकाश ठाकूर, आगरी कोळी कराडी सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत, जिज्ञा ठाकूर, प्रणाली ठाकूर, अवंतिका ठाकूर, शाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे, सतीश मोरे, शिवाजी साळूंखे, सरोजिनी मढवी, आदिवासी आश्रम शाळेचे शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.