एक हजार आदिवासी बांधवांना जातीचे दाखले वाटप
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
महसूल विभाग पनवेल आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कर्नाळा ग्राम पंचायत हद्दीतील एकूण सात आदिवासी वाड्या एकत्र करून काही दिवसांपूर्वी आखाडा वाडीवर जातीच्या दाखल्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या सर्व आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले तयार करून ते व्यवस्थित लॅमिनेशन करून त्याचे वाटप करण्यात आले.

भारत स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कातकरी उत्थान अभियाना अंतर्गत सुरू असलेल्या सप्टसुत्री कार्यक्रमा चे औचित्यत्य साधून एक हजार जातीचे दाखले वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना राहुल मुंडके म्हणाले की, आदिवासी बांधवांनी शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असून भविष्यात असा दिवस येईल की तुमच्यातील एक व्यक्ती शिकून मोठा अधिकारी बनून येथे जातीचे दाखले वाटप करण्यासाठी येईल. तसेच त्यांच्या कार्यकाळात जे काही सहकार्य लागेल ते करण्याचे आश्वासन दिले.

तहसीलदार विजय तळेकर यांनी सरकारी योजनांचा लाभ कसा मिळवावा याचे मार्गदर्शन केले. उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार यांनी जातीच्या दाखल्याचे महत्त्व समजावून सांगितले. मंडळ अधिकारी मनोज मोरे यांनी आदिवासी बांधवांना प्रगती करायची असेल तर त्याचा मार्ग शिक्षणातून च जातो हे सांगितले. आदिवासी विकास निरीक्षक सुर्यवंशी सर देखील प्रसंगी हजर होते. तलाठी विनय पाटील, लोंढे तात्या, प्राचार्य राजेंद्र मढवी,कोतवाल आणि सर्व टीम यांनी कार्यक्रमाचे योग्य असे आयोजन केले. सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर आणि रत्नाकर घरत यांनी सर्वांचे आभार मानले.








Be First to Comment