पनवेल तालुक्यातील माध्यमिक शाळांचे व शिक्षकांचे प्रश्न समजवून घेवून सोडविण्याचा प्रयत्न
सिटी बेल • पाणदिवे • प्रतिनिधी •
रायगड जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाशी संलग्न असलेल्या पनवेल तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाची मासिक सभा सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या नवीन पनवेल येथील बांठीया माध्यमिक शाळेत उत्साहात संपन्न झाली.
या वेळी रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे पवार यांनी भेट देवून उपस्थित मुख्याध्यापकांना व शिक्षकांना मार्गदर्शन करून पनवेल तालुक्यातील माध्यमिक शाळांचे व शिक्षकांचे प्रश्न समजवून घेवून ते प्रश्न लवकरच सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.
या वेळी पनवेल पंचायत समिति गटशिक्षणाधिकारी श्री.खामकर , रायगड माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष्य भगवान माळी ,केंद्र प्रमुख श्री.म्हात्रे ,कोपरा माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.गावीत ,संदेश पाटील , श्री.ठाकरे,श्री.ठाकूर ,सौ.वळवी,श्री.अंतुले,रोहीणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.सभेच्या सुरवातीला पनवेल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पंकज भगत यांनी रायगड शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे पवार यांचे पुप्षगुच्छ देवून स्वागत केले.








Be First to Comment