विविध मागण्यासाठी ऑइल फिल्ड एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे साखळी उपोषण
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी, कामगारांच्या हिताचे असलेले सोयी सुविधा देण्यास टाळाटाळ करत असल्या बद्दल तसेच मुंबई हायकोर्ट, सुप्रीम हायकोर्ट यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास ओ एन जी सी प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने या अन्याया विरोधात आवाज उठविण्यासाठी ऑइल फिल्ड एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे संघटनेचे अध्यक्ष शालिग्राम मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ओ एन जी सी उरण प्लांट, ए पी यु गेट समोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.सदर साखळी उपोषण 15 फेब्रुवारी 2022 पासून सुरु झाले असून जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण ओ एन जी सी प्रशासना विरोधात असेच सुरु राहणार असल्याची माहिती उपोषणकर्ते सुनील नाईक यांनी दिली.
मुंबई हायकोर्टने कामगारांना पर्मनंट म्हणून नोकरीत घ्यावे व पर्मनंट नोकरीचे सर्व सेवा सुविधा कामगारांना द्यावेत असे आदेश ओ एन जी सी प्रशासनाला दिले.मुंबई हायकोर्टाच्या 1996 सालच्या आदेशानुसार ओ एन जी सी प्रशासनाने 1/4/1997 साली कामगारांना पर्मनंट म्हणून कामावर न घेता ‘डायरेक्ट कामगार’ म्हणून कामगारांना कामावर घेतले. वास्तविक पाहता कामगारांना पर्मनंट म्हणून नोकरीत सामावून घ्यावे असे न्यायालयाचे आदेश असूनही कामगारांना पर्मनंट म्हणून नोकरीत न घेता त्यांना डायरेक्ट कामगार म्हणून ओ एन जी सी प्रशासनाने त्यांना नोकरीत सामावून घेतले.डायरेक्ट कामगार म्हणून भरती केलेल्या सर्व कामगारांना विविध सेवा सुविधा पासून ओ एन जी सी प्रशासनाने वंचित ठेवले. गेली 24 वर्षे कामगारांना पगारवाढ, मेडिक्लेम, इन्शुरन्स, पेन्शन, ग्रॅज्यूईटी तसेच इतर कोणत्याही सुविधा ओ एन जी सी प्रशासनाने या कामगारांना दिलेल्या नाहीत. या विविध मागण्यासाठी कामगार वर्गांनी संघटनेमार्फत कायदेशीर पत्रव्यवहार करून देखील कामगारांना न्याय मिळाला नाही. ओ एन जी सी प्रशासनाने कामगारांच्या मागण्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप साखळी उपोषण करणाऱ्या कामगार वर्गांनी केला आहे. मुंबई विभागा अंतर्गत मुंबई युनिट, पनवेल युनिट, न्हावा युनिट, उरण युनिट, ऑफसर युनिट अशा युनिट मधील 196 कामगारांवर हा अन्याय चालू आहे.
उपोषणस्थळी सुनील नाईक, निरंजन लवेकर, महेश घरत, तुकाराम पाटील, परवीर गुप्ता, प्रमोद म्हात्रे, जयंत कासारे, मंदार काठे, दिपक कोळी, विजय गमरे, प्रकाश पाटील, रवी म्हात्रे, जयवंत भोईर, जीवन पाटील, मंगेश नाखवा, हरेश थळी, रेखाताई पालकर, भीमाबाई म्हात्रे आदी ऑइल फिल्ड एम्प्लॉईज असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य, कामगार वर्ग यावेळी उपस्थित होते.
कामगार वर्गांच्या मागण्या :-
1)पर्मनंट कामगारांचा (रेगुलर कामगारांचा )पगार डायरेक्ट कामगार म्हणून जॉईन झालेल्या सर्व कामगारांना विनाअट मिळावी
2)ग्रॅज्युइटी, पेन्शन आदी सुविधाचा लाभ सेवानिवृत्त (रिटायर )होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळावा
3)कामगारांच्या कुटुंबाना सुरक्षेची हमी मिळावी
4)आरोग्य विमा, इन्शुरन्सचा लाभ सर्व कामगारांना मिळावा
5)वेळोवेळी पगारात वाढ करावी
6)रेगुलर /पर्मनंट कर्मचाऱ्यांना जो पगार, ज्या सेवा सुविधा मिळतात त्या सर्व सेवा सुविधा डायरेक्ट कामगार म्हणून जॉईन झालेल्या सर्व कामगारांना मिळावा.













Be First to Comment