वाशी येथे शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
सिटी बेल • खांब-रोहे • नंदकुमार मरवडे •
रोहे तालुक्यातील वाशी या गावी गेल्या अनेक वर्षांची यशस्वी परंपरा राखत याही वर्षी शिवजयंती उत्सव सोहळ्यातंर्गत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सव सोहळ्यातंर्गत ता.१८ रोजी शिवज्योत आणण्यासाठी रायगडकडे प्रस्थान,तर ता.१९ रोजी पहाटे ४:३० वा.किल्ले रायगड ते वाशी शिवज्योत यात्रेस प्रारंभ,सकाळी ११ वा.शिवज्योतीचे वाशी या गावी आगमण व शिवज्योतीचे पूजन व शिववंदना,तद्नंतर ११:३० वा.वाशी रंगमंचावर शिवज्योत विराजमान व श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व अभिषेक सोहळा,दु.३ ते ५ भव्य मशाल यात्रा,सायं.५ ते ७ या वेळेत वाशी-लांढर-धाटाव पंचक्रोशी वारकरी संप्रदायाचे हरिपाठ, व तद्नंतर ह.भ.प.जाग्रुती खेरटकर यांचे शिवचरित्रपर सुश्राव्य किर्तनसेवा आदी कार्यक्रमांबरोबरच याच सोहळ्यातंर्गत समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा सन्मान सोहळा व शिववंदना वाचनलयाच्या उपक्रमातर्गत स्पर्धेचे बक्षिस वितरण व रात्रौ.९:३० वा.महाप्रसाद व शिवविचार मंथन व समारोप आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
या सर्व सोहळ्याचे यशस्वीतेसाठी ग्रामस्थ, महिला, तरूण-तरूणी व शिववंदना वाचनालय वाशी अधिक मेहनत घेत आहेत.








Be First to Comment