सिटी बेल लाइव्ह / रोहा ( शरद जाधव)
मोठ्या भावाचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या घरी राहण्यास गेलेल्या लहान भवाच्या बंद घरात शिरुन अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. सदर घटना कोलाडातील गोवे या गावी घडली आहे.
अगोदरच कुटुंबावर दुखाचे डोंगर अणि त्यात हे दुसरे संकट कोसळले आहे.
गोवे या गावातील चंद्रकांत जाधव वय 55 वर्ष यांचा 3 ते 4 दिवसा पुर्वी अचानक मृत्यू झाला. त्यांना साधा ताप आला होता. त्यामधे त्यांचा मृत्यू झाला. ते घरातील कुटुंब प्रमुख होते. त्याचा दुग्ध व्यवसाय होता. भावाचा मृत्यू झाला म्हणूण गोवे नविन वसाहत येथे रहाणारा भाऊ गजानन जाधव मोठ्या भावाच्या जुन्या घरी राहण्यास गेला होता. घर कुलुप लाऊन बंद करण्यात आले होते. याचा फायदा चोरट्यांनी उचलत बंद घराचा लॉक तोडून आत मधे प्रवेश करीत रोख रक्कम वीस हजार व एक मोबाईल चोरुन नेला.
सध्या लॉक डाऊन आहे कोरोना संकट असल्याने बेकारी वाढली आहे. यातून चोरीचा प्रकार घडत असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यातच घरात मृत्यू झाला आहे, घर बंद आहे हे चोरट्यांना माहित कसे ? यावरुन चोर हा माहीतगार असावा असा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत.
सदर गुन्ह्याची नोंद कोलाड पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. घरात चोरी झालेले गजानन जाधव यांची सुध्दा आर्थीक परिस्थिती बेताची आहे अणि त्यातच लॉकडाऊन अणि घरात मोठ्या रकमेची चोरी यामुळे त्यांच्यावर भावाच्या मृत्यू बरोबर आर्थिक संकट देखील कोसळले आहे. पोलीसांनी या गुन्ह्याचा तपास जलद गतीने लावावा जेणेकरुन अरोपींना जरब बसेल अशी मागणी जोर धरत आहे.






Be First to Comment