Press "Enter" to skip to content

ग्रामस्थांची कर्जत नगर परिषदेकडे मागणी

गुंडगे येथील संत रोहिदास नगर येथे चौकात चबुतरा बांधावा : ग्रामस्थांची मागणी

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे येथील संत रोहिदास नगर येथे चौकात चबुतरा बांधावा अशी मागणी संत रोहिदास नगर येथील ग्रामस्थांनी कर्जत नगर परिषदेकडे केली आहे.

गुंडगे संत रोहिदास नगर येथे चौकामध्ये संत रोहिदास नगर असा चार बाय तीन फूट चा फलक लावलेला आहे, या ठिकाणी प्रत्येक वर्षी आम्ही ग्रामस्थ संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करीत असतो, सदर चौकांमध्ये चार फूट बाय तीन फूट चबुतरा बांधकाम नगरपालिकेने करून द्यावे व सदर चौकात स्ट्रीट लाईट चा पोल लावून त्यावर मरक्यूरी लाईट लावावेत अशी मागणी एका निवेदनाद्वारे संत रोहितदास नगर येथील ग्रामस्थांनी केली आहे.

16 फेब्रुवारी 2022 रोजी संत रोहिदास महाराज यांची 644 वी जयंती आहे त्यापूर्वी हे काम झाले तर बरे विथ अशी विनंती करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.