Press "Enter" to skip to content

दस्तुरी येथे पालखी व दिंडीसाठी निवासस्थानाची गरज

वारकऱ्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधीची गरज : धनगर समाजाचे नेते बबन शेडगे

सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •

कोकणासह रायगड – ठाणे जिल्ह्यातून दरवर्षी श्री क्षेत्र आळंदी, पंढरपूर, शिर्डी, आई एकविरे सह अन्य अनेक तीर्थ क्षेत्रा ठिकाणी आपल्या श्रद्धास्थानाचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी पालखी व दिंड्या काढून मोठ्या प्रमाणावर जात असून यात खोपोलीपासून सुरू होणाऱ्या बोरघाटातील दस्तुरी येथे शिंग्रोबा कमिटीच्या वतीने येणाऱ्या बहुतांश पालखी व दिंड्याचे यथोचित सत्कार करून त्यांच्या विश्रांतीसाठी विशेष सहकार्य व नाष्टाची सोय शिंग्रोबा कमिटीच्या माध्यमातून करण्यात येत असते.

मात्र शिंग्रोबा कमिटीचे संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य आपल्या परिने सर्व मदत दिंडी व पालखीतील वारकरी मंडळींना करित असताना याठिकाणी काही सुविधांचा अभाव असल्याने शिंग्रोबा कमिटीला मदतीचा हात देताना मोठी कसरत करावी लागत असून ही सर्व कसरत दूर व्हावी आणि वारकरी मंडळींना योग्य सुविधा मिळावी यासाठी विशेष निधीची गरज असून या निधीच्या माध्यमातून याठिकाणी काही सुविधा उपलब्ध करता येतील, असे मत शिंग्रोबा कमिटीचे संस्थापक – अध्यक्ष बबन शेडगे यांनी गोवरदेव (कांजूरमार) येथील आई एकविरेच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताप्रसंगी केले.

कोकणासह रायगड – ठाणे जिल्ह्यातून दरवर्षी श्री क्षेत्र आळंदी, पंढरपूर, शिर्डी, आई एकविरे सह अन्य अनेक तीर्थ क्षेत्रा ठिकाणी आपल्या श्रद्धास्थानाचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी पालखी व दिंड्या काढून मोठ्या प्रमाणावर जात असून यात खोपोलीपासून सुरू होणाऱ्या बोरघाटात यातील वारकरी मंडळीना विश्रांतीसाठी जागा उपलब्ध नसल्याने हे सर्व वारकरी मंडळी हे दस्तुरी येथील पालखी व दिंडी निवासस्थान विसावा ठिकाणी विश्रांती घेत असताना याठिकाणी बहुतांश वारकरी मंडळींना शिंग्रोबा कमिटीच्या वतीने नाष्टा व चहा पाण्याची सोय केली जाते,

परंतु ही सर्व सोय करित असताना कमिटीतील सभासदांना काही सुविधांंची कमतरता भास असल्याने अनेक वर्षांपासून काही या सोयी सुविधा पुरवण्यासाठी कसरत करावी लागत असते, त्यामुळे वारकऱ्यांना योग्य सोयी सुविधा मिळाव्या यासाठी शासनाने दस्तुरी फाटा येथे विशेष निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थ वर्ग करीत आहेत. याप्रसंगी शिंग्रोबा कमिटीचे संस्थापक – अध्यक्ष बबन शेडगे, लक्ष्मण बावदाने, भाऊ शेडगे, बाळासाहेब हिरवे (मल्हारवाडा), बबन खरात, भरत कोकरे, सतीश शेडगे, हनुमंत बुरूमकर, नारायण हिरवे, दत्ता शेडगे, आदीप्रमुख उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.