डोक्यात दगड मारुन नातेवाईकांनाही लाथा बुक्यांची मारहाण, आरोपी अटकेत
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
रिस येथे ओटीभरण कार्यक्रमास बाहेरून स्वतःच्या गाड्या घेवून पाहुणे आले होते.
शेजारी असलेल्या असवले बिल्डींगमधील इसमासोबत रविवारी रात्री २१.१५ वाजण्याच्या सुमारास गाडी पार्किंग करण्यावरून वाद झाला .
या वादात अभिषेक,कैलास व इतर ८ ते १० जणांनी प्रविण पांडुरंग ठोंबरे यांच्या डोक्यात व काका सुरेंद्र प्रभाकर चौधरी यांच्या उजव्या भुवयीच्यावर दगड मारून दुखापत केलेली असून प्रविण पांडूरंग ठोंबरे यांच्यावर नवी मुंबई येथील डी.वाय पाटील हाॕस्पिटल येथे उपचार सूरू असून इतर नातेवाईकांना लाथा बुक्यांनी मारहाण झाली आहे.तर जखमी सुरेंद्र प्रभाकर चौधरी याच्यावर रिस येथील रेगे हाॕस्पिटल चांभार्ली येथे उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी सागर चौधरी यांनी रसायनी पोलिसांत फिर्याद दिली असून आरोपींच्या रसायनी पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत१ ) अभिषेक , २ ) कैलास व इतर ८ ते १० इसमांच्याविरोधात रसायनी पोलीस ठाण्यात भा.द.वी.सं कलम ३२५,३२४ , ३४१ , १४३ , १४७ , १४ ९ म.पो. अॅक्ट ३७ ( १ ) ( ३ )नुसार गुन्हा दाखल झालेला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गुंड अधिक तपास करत आहेत.







Be First to Comment