कर्जत नगर परिषदेच्या विषय समित्यांवर महायुती
सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •
कर्जत नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवड करण्यात आली आहे, या चारही समित्यांवर शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे सभापती विराजमान झाले आहेत, चारही सभापती बिनविरोध विराजमान झाल्याने महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
नगरपरिषदेच्या सभागृहात विषय समित्यांच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक कामकाज कामी सहाय्यक पीठासीन अधिकारी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी सहकार्य केले.नगर परिषदेमध्ये 18 नगरसेवक आहेत, त्यापैकी 10 नगरसेवक शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीकडे आहेत तर 8 नगरसेवक राष्ट्रवादी – मनसे -स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी-शिवराय भिमराय क्रांती संघटना या महाआघाडीचे आहेत.

# विषय समिती सभापती #
# स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती पदसिद्ध सभापती उपनगराध्यक्ष-अशोक ओसवाल, सदस्य-बळवंत घुमरे,विवेक दांडेकर, शरद लाड,ज्योती मेंगाळ.
# पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती-प्राची डेरवणकर,सदस्य-विवेक दांडेकर, वैशाली मोरे, पुष्पा दगडे, मधुरा चंदन(पाटील).
# विज, सार्वजनिक बांधकाम, शहर नियोजन विकास समिती सभापती-राहुल डाळींबकर, सदस्य-नितिन सावंत, संचिता पाटील, उमेश गायकवाड,सोमनाथ ठोंबरे.
# महिला व बालकल्याण समिती सभापती-विशाखा जिनगरे,उपसभापती-संचिता पाटील सदस्य- स्वामिनी मांजरे, सुवर्णा निलधे, भारती पालकर.
# स्थायी समिती पदसिद्ध सभापती -अध्यक्ष सुवर्णा जोशी, सदस्य – अशोक ओसवाल,प्राची डेरवणकर,राहुल डाळींबकर, विशाखा जिनगरे








Be First to Comment