Press "Enter" to skip to content

शिवजयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

सिटी बेल • काशीनाथ जाधव •
पाताळगंगा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मानवहीत लोकशाही पक्ष रायगड जिल्हा अध्यक्ष कृष्णा झोंबाडे यांच्या वतीने रिस येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या आरोग्य शिबिरात डायबेटिस आणि जनरल मेडिकल तपासणी प्रायमरी चेक अप उंची, वजन ,बीपी, ऑक्सिजन, बॉडी मास इंडेक्स , कंप्लेट ब्लड काउंट, रँडम ब्लड शुगर ,लिव्हर, किडनी, थायराइड ब्लड ग्रुप, यूरिन टेस्ट करण्यात येत असल्यांचे समजते.

तज्ञ डॉक्टर मंगेश बंग, डॉ.सना कुरेशी, डॉ. अंजली बंग, डॉ. मनीष खोलार्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रीस हॉस्पिटल दांड आपटा रोड रीस येथे सकाळी ७ ते ११ यादरम्यान मोफत तपासणी होणार असून रसायनी परिसरातील गरजू रुग्ण ईको चालक, रिक्षा चालक यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा या अगोदर रीस हॉस्पिटल 9699826747 व मनीषा पवार 9527388492 या नंबरवर रजिस्टेशन करावे अशी विनंती मानवहीत लोकशाही पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष कृष्णा झोंबाडे यांनी सांगितले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.