सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १८ जण सापडले तर २० जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज एकूण पॉझिटीव्ह ८८७, उपचार करून बरे झालेले ६९१, उपचार घेणारे १६६, मयत ३० असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज कोटनाका १, करंजा १, फुंडे २, करंजा नवापाडा १, मस्जिद मोहल्ला १, मासळी मार्केट१, आवरे १, जांभूळपाडा २, जेएनपीटी १, केगाव १, मुळेखंड १, जसखार २, बदाम वाडी १, वेश्वि १, धुतुम १ असे एकूण १८ पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर उरण २, गणेश नगर करंजा १, नवे पोपूड म्हातवली २, डोंगरी १, जांभूळपाडा १, एनएडी उरण १, बोकडविरा २, करंजा १, जेएनपीटी २, मुळेखंड २, नागाव म्हातवली १, धाकटी जुई १, वेश्वि १, विंधणे १, पागोटे १ असे एकूण २० जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
उरण ग्रामीण भागात पॉझिटीव्हचा आकडा कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील जनतेने जागृत राहावून योग्य ती खबरदारी घेत कोरोनाचा सामना करावा लागणार आहे.






Be First to Comment