Press "Enter" to skip to content

“चेस फोर एव्हरीवन” उपक्रम

सीनियर नॅशनल आर्बिटर म्हणून अमित कदम व श्रेयस पाटील यांची निवड

सिटी बेल • पनवेल • विजयकुमार जंगम •

जागतिक बुद्धिबळ संघटना फीडे यांचे नॅशनल आर्बिटर तर भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे सीनियर नॅशनल आर्बिटर म्हणून अमित कदम व श्रेयस पाटील यांची निवड करण्यात आली.

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने “चेस फोर एव्हरीवन” या उपक्रमाअंतर्गत पाच दिवसीय (३० तासांचे) राष्ट्रीय पंच प्रशिक्षण शिबीर ऑनलाइन घेतले. रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे या राष्ट्रीय पंच प्रशिक्षण शिबीरासाठी राज्यस्तरीय पंच परीक्षेत ए ग्रेड मिळविलेले अमित कदम आणि श्रेयस पाटील यांची निवड करण्यात आली होती.

शिबिर पूर्ण करून घेतलेल्या सहभागी सर्वांची लेखी/ प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. या लेखी परीक्षेत रायगड मधील आपले राज्यस्तरीय पंच अमित कदम आणि श्रेयस चंद्रशेखर पाटील हे यशस्वी पणे सिनीअर नॅशनल राष्ट्रीय पंच म्हणून बहुमान संपादिला. जागतिक बुद्धिबळ संघटनेतर्फे त्यांना नॅशनल आर्बिटर असे लायसन्स देण्यात येणार आहे.

श्रेयस पाटील हा सीकेटी कॉलेज पनवेल येथे एम. एस .सी. (कम्प्युटर सायन्स )करत आहे.तो मेढेखार गावातील बुद्धिबळाचे प्रशिक्षक ,आयोजक तसेच पंच असलेले सी .एन .पाटील यांचे चिरंजीव आहेत. संपूर्ण भारतातून या शिबिरातून राष्ट्रीय पंच म्हणुन 481 जण उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत ए व बी ग्रेड मिळालेल्या सर्वांना जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे )यांच्याकडून नॅशनल आर्बिटर ( राष्ट्रीय पंच )असे लायसन्स तर सीनियर नॅशनल आर्बिटर टायटल अशा पदवीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

महाराष्ट्रा मधून 29 जण पास झाले आहेत. 24 जण “B” ग्रेड मध्ये तर 5 जण “C” ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या दोघांना रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष विलास म्हात्रे तसेच पनवेल चेस असोसिएशनचे सचिव सी. एन.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले .सर्व रायगड बुद्धिबळ स्पर्धक आणि रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटने कडून सीनियर नॅशनल आर्बिटर झाल्याबद्दल त्या दोघांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.