Press "Enter" to skip to content

मा. आ पा रा सानप यांचा पुण्यस्मरण सोहळा

माजी आमदार पा.रा.सानप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा झुंजार नेता,तरुणांनी तंटे मिटविण्यात वेळ घालविण्यापेक्षा समाज संघटित करा :- शंकरराव म्हसकर

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

४० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसे त्या काळात आमदार पा.रा.सानप यांनी सहकार क्षेत्राची निर्मिती केली व शेतीचे मालक कुळ झाले पाहिजे यासाठी दादासाहेब यांनी सर्वांना एकत्रित करून मोठा लढा व संघर्ष केला.त्याकाळात तालुक्यातील गोवे येथील ५७ एकर जमीन काबीज करण्याचा सरकार प्रयत्न होता परंतु खंदे समर्थक रावजी जाधव ( कारभारी)विठ्ठल पवार व इतर १६ नेते हाताशी घेऊन संघर्ष करून आमदार पा.रा.सानप यांनी हानून पडला होता.त्यातच दादा साहेब अधिक जिव्हाळ्याचे होत खऱ्या अर्थाने पा.रा.सानप हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे झुंझार नेते होते.त्यांचे हे ऋण फेडण्यासाठी त्यांचे कार्य अविरतपणे पुढे नेण्यासाठी तरुणांनी तंटे मिटविण्यात वेळ घालविण्यापेक्षा समाज संघटित करा त्यांचा आदर्श निर्माण केला पाहिजे समाजाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे मत कै. पा. रा. सानप यांच्या स्मुती दिनी कोलाड ग्रुप कुणबी समाजाच्या सभेत कुणबी समाज नेते शंकरराव म्हसकर यांनी व्यक्त केले.

कुणबी समाजनेते तथा माजी आमदार स्व पा रा सानप यांची २७ वे पुण्यस्मरण सोहळा कुणबी समजोन्नती संघ मुबंई व रायगड जिल्हा समन्वय समिती ग्रामीण शाखा रोहा ग्रुप कोलाड च्या वतीने कोलाड येथील मंगल कार्यलयात आयोजीत करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते .

यावेळी विचारमंचावर खांब विभागीय नेते रामचंद्र चितळकर, नारायणराव धनवी,मारुती खांडेकर,ऍड सुनील सानप, राजेश सानप, रोहा पंचायत समितीच्या सदस्या व माजी सभापती सौ वीनाताई चितळकर, विजय सानप,दिवानशेठ सानप,प्रमुख मान्यवर व आदी कोलाड विभागातील कुणबी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित पुढे म्हणाले की सलग तीन वेळा दादासाहेब विधिमंडळात जनमतांवर निवडून गेले त्यांनी विधिमंडळात ग्रामीण जनतेची व शेतकऱ्यांची उपजीविका म्हणून शेती त्यामुळे त्यांना हमी भाव मिळाला पाहिजे तसेच बेदखल कुळांचा प्रश्न यासाठी आवाज उठवत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन श्री गणेशाला व शिवछत्रपती शिवरायांना वंदन तसेच माजी आ. कै.पा.रा.सानप यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आली तद्नंतर मान्यवरांचे स्वागत तसेच पत्रकार नांकुमार मरवडे,विश्वास निकम, रविना मालुसरे,यांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या समाज बांधवांचे स्व पा रा सानप यांच्या स्मरण प्रित्यर्थ त्यांचा विशेष सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

माजी आ.स्व पा रा सानप यांच्या २७ व्या पुण्यस्मरण सोहळ्यास कोलाड विभागातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या प्रसंगी कुणबी समाज नेते रामचंद्र चितलकर, नारायण धनवी,ह.भ.प.दहिंबेकर महाराज, दगडू शिगवण, विजय सानप, एकनाथ बागुल, ऍड सुनिल सानप,चंद्रकांत लोखंडे, डॉ. मंगेश सानप,डॉ.सागर सानप,राजेश सानप, शिवराम महाबळे, अजय कापसे सर,व इतर मान्यवरांनी दादांचे स्मरण व आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.

आमदार पा.रा.सानप यांनी समाजासाठी संघर्ष केला त्यांच्या न्याहक्कसाठी लढा उभा केला सहा महिने हद्दपार देखील झाले तरी देखील विविध वेषांतर करत समाज जागृत झाला पाहिजे तो सुशिक्षित झाला पाहिजे ही भावना उराशी बाळगत समाज्यासाठी निष्ठेने काम केले. काम करत धनवी यांनी त्यांच्या आठवणीतील एक किस्सा सांगितला की नारायणराव तुमच्या खिश्यात एक रुपया असेल तर त्यातील बाराआने हे समाज्याचे आहेत तर केवळ चारआनेवरच तुमचा अधिकार असा आर्थिक उलढालीचा अभ्यास स्व दादांना असल्याचा एक अनुभव व्यक्त केला तर त्यांच्या वागण्याचा व त्यांच्या जीवनातील प्रवास तीन वेळा आमदार झाले परंतु तिन्हीवेळेला वेगवेगळ्या मतदारसंघातुन ते निवडून आले सुरवातीला रोहा सुधागड,रोहा मुरुड व नंतर रोहा माणगाव असा खडतर आणि विरोधकांना भडिमार असा निवडणूकीचा प्रवास त्या काळात विरोधी बाकावर बसत आपली शैक्षणिक पात्रता पणाला लावत सरकला धारेवर धरत ग्रामीण जनतेच्या न्याय हक्कासाठी वसडो की पळो करून सोडत असत त्यांच्या बद्दलच्या प्रवास व त्या कालचे प्रसंग ऐकताना अनेकांचे अश्रू अनावर होत असतांना सदरच्या कार्यक्रमात पहावयास मिळाले .

त्याच प्रमाणे समाज पुढे नेण्यासाठी आपल्या समाजाचे जातीचे दाखले,रूढी परंपरानुसार चाललेले अतिरिक्त खर्च टाळणे,शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करणे यासाठी तरुण व जेष्ठ एकत्र येऊन मार्ग कसा काढता येईल असे प्रयत्न केले तरच खऱ्या अर्थाने कुणबी समाजासाचे नेते माजी आमदार पा रा सानप यांचा स्मुतीस अभिवादन ठरेल.तर नंदकुमार मरवडे सर यांनी आपल्या काव्य कवितेतून संभे गावाचे सुपत्र आमदार पावरा सानप जय जय दादा साहेब,त्यांनी केलेले कार्य पुढे नेऊ असे गायन केले त्या गायनाला अनेकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

कै.आमदार पा रा सानप २७ वी पुण्यस्मरण सोहळा कोलाड ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवाते यांनी केले प्रास्ताविक अध्यक्ष संदेश लोखंडे यांनी केले व आभार महेश ठाकूर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश सानप,राजेश कदम,डॉ मंगेश व डॉ सागर सानप,सह कोलाड ग्रुप च्या पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.