Press "Enter" to skip to content

६१ गावात जल जीवन मिशन द्वारे अंमलबजावणी

महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्टच्या वतीने आदिवासी वाडीवर पाणीपुरवठा

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील डोंगर भागात राहणाऱ्या आदिवासी वाड्यांवर आजही पाणीपुरवठा होत नाही तेथील नागरीकांना पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याने सदर बांधवांची तहान भागविण्याकरिता पेण तालुक्यातील महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्टने पुढाकार घेतला असून त्यांच्या माध्यमातून आदिवासी वाडीवर पाणीपुरवठा होणार आहे.केंद्र शासनाच्या हर घर हर जल योजनेनुसार जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी करण्यात येत आहे.

त्यामुळे २०२४ पर्यंत संपूर्ण देश टॅंकर मुक्त होणार आहे.मात्र रायगड जिल्ह्यातील काही आदिवासी वाड्यांवर अजूनही पाणी पोहचला नसल्याने याकरीता महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट अंतर्गत कर्जत तालुक्यात ६१ गावात जल जीवन मिशन द्वारे अंमलबजावणीसाठी सदर ट्रस्ट सहाय्यक संस्था (आयएसऄ) म्हणून कार्यरत राहणार आहे.

त्यानुसार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता संजय वेंगुर्लेकर, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष मनोज गावंड आदिंसह आदिवासी बांधव उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.