पालकमंत्री आदितीताई तटकरे यांचे जिल्ह्याची प्रगती व विकासात्मक जडणघडणीत मोठे योगदान : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षा गीताताई पालरेचा यांचे प्रतिपादन
सिटी बेल | पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी सक्षम व कार्यकुशल पालकमंत्री म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा अवघ्या जिल्ह्यासह महाराष्ट्रात उमटविला आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांचे जिल्ह्याची प्रगती व विकासात्मक जडणघडणीत मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा तथा पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा
गीताताई पालरेचा यांनी केले आहे.

गीताताई पालरेचा
शनिवार दि.(12) रोजी पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. जिल्ह्यात आदीतीताई तटकरे यांना पालकमंत्री व त्यांच्या कार्याला सर्वस्थरातून जोरदार पाठिंबा मिळत आहे. त्यांचे आपल्या कृतीतून जन मानसाच्या हृदयावर अधिराज्य आहे. समाजमाध्यमात सर्वसाधारण जनताही त्यांच्या बाजूने ठाम उभी राहिली असून त्यांना पाठिंबा दर्शविण्याची मोहीम राबविली जात आहे.
पालकमंत्री पदावरून त्यांचे काम सुनियोजित, सकारात्मक व योग्य पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला पक्ष संघटना तसेच तमाम युवतींचा त्यांना जाहीर पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हाध्यक्षा गीताताई पालरेचा यांनी जाहीर केले. आदीतीताई तटकरे या रायगडवासीयांच्या हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण व न्यायिक दृष्टीचे निर्णय घेत आहेत. पालकमंत्री पदावरून जिल्ह्याला विकासाच्या दिशेने नेत जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलवण्याचे काम ना. तटकरें करीत आहेत. अशा रायगडच्या मातीतील व सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची पुरेपूर जाणीव असलेल्या पालकमंत्री आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. असे गीताताई पालरेचा म्हणाल्या.

पाली सुधागड सह संपुर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीला उभारी देण्यात राष्ट्रवादीचे नेते विद्यमान खासदार सुनिल तटकरे व ज्येष्ठ नेते, माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल यांचे मोलाचे योगदान लाभले आहे, शिवाय सुधागड तालुक्याला विकासात्मकदृष्ट्या भरीव निधी खा.सुनिल तटकरे, पालकमंत्री आदितीताई तटकरें व आ.अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून उपलब्द करून दिला जातोय.
पाली सुधागडच्या पर्यटन विकासासाठी पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांच्या माध्यमातून विविध विकासकामे, मूलभूत व पायाभूत नागरी सेवा सुविधा , यासाठी तब्बल 105 कोटीचा भरीव निधी उपलब्द करून देत विकासाला गती देण्याचे काम केले. यामध्ये ग्रामीण रुग्णालय, बहुउद्देशीय आदिवासी संकुल वसतिगृह , पालीतील अंतर्गत रस्ते , पाटनुस रस्ता आदी अनेकविध कामांचा समावेश आहे.

विकासात्मक दूरदृष्टी , जनहीताची कास व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न व समस्यांना जलदगतीने न्याय देण्याची भूमिका घेणाऱ्या कार्यक्षम पालकमंत्री आदीतीताई तटकरें या आदर्श राजकारणी म्हणून महाराष्ट्रात नावलौकिकास आल्या आहेत. त्यांची दिवसागणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दमदार व प्रभावी कामगीरी सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे जिल्हाध्यक्षा पालरेचा म्हणाल्या.
मागील पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पालीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा याकामी पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांनी विशेष पुढाकार घेतला, व आज पाली नगरपंचायत साकारली आहे, त्याबद्दल पालीकर जनतेच्या वतीने विशेष आभार मानते. असे पालरेचा म्हणाल्या.
नगरपंचायत निवडणुकीत पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांनी होम टू होम प्रचार केला, त्याचेच फलित होत पाली नगरपंचायतीवर सत्ता प्रस्थापित झाली. नगरपंचायत निवडणुकीत अचूक व योग्य मार्गदर्शन करून नगराध्यक्ष होण्यासाठी मनपरिवर्तन व मतपरिवर्तन आदीतीताई यांनी घडवून आणले, त्यामुळेच पाली नगराध्यक्ष पदाचा मुकुट माझ्या शिरावर बसला. असे नवनिर्वाचित नगराध्यक्षा गीताताई पालरेचा यांनी नम्रपणे कबूल केले.
पालकमंत्री आदितीताई तटकरें यांना रायगड जिल्ह्यातील तमाम महिला व युवती पदाधिकारी यांच्यावतीने भरभक्कम असा पाठिंबा आहे. व राहील असे गीताताई पालरेचा यांनी शेवटी सांगितले.








Be First to Comment