प्लॉटिक पिशवीचा वापर करणा-यांवर कर्जत मुख्याधिका-यांची कारवाई
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
प्लॉटिक पिशव्यांवर शासनाने बंदी घातली आहे, तरी अजून काही व्यापारी, नागरिक राजरोस पणे प्लॉटिक पिशव्यांचा वापर करत आहे, प्लॉटिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

कर्जत शहरात प्लास्टिक बंदी काटेकोरपणे पाळली जात असून त्याची अंमलबजावणी करीत असताना नियम मोडणारे यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जात आहे, काल दि.11 फेब्रुवारी रोजी शुक्रवारचा बाजार भरला होता मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी सर्व कर्मचारी वर्गाला बरोबर घेवून सायंकाळी मुख्य बाजार पेठेत पाहणी केली, जे व्यापारी अजून ग्राहकांना प्लॉटिक पिशवी देतात अश्या तीन व्यापाऱ्यांवर प्रत्येकी 5 हजार रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई केली.मुख्याधिकारी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शखाली अरविंद नातू, जितेंद्र गोसावी,मनिष गायकवाड, लक्ष्मण माने, सुदाम म्हसे, सुनिल लाड आदी कर्मचारी वर्ग सहभागी होता.
पथक फिरते राहणार आहे,जे कोणी प्लॉटिक पिशवीचा वापर करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
— डॉ. पंकज पाटील – मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद








Be First to Comment