Press "Enter" to skip to content

आंबिवली येथे हळदीकुंकू समारंभ

श्री शारदा अभिनव प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित यांच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकू

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

महिला वर्गांना विविध उपक्रमात सहभाग होता यावे,ह्या दृष्टीकोणांतून श्री शारदा अभिनव प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित यांच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन आंबिवली येथे करण्यात आले होते.

प्रथम गणेश पुजन करुन,या संस्थेची माहिती देण्यात आली.नंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.विशेष म्हणजे या संस्थे मध्ये महिला वर्ग असून सर्व कारभार महिला वर्ग पाहत आहे.आजच्या धावपळीच्या जिवनात महिला वर्ग एकत्र येणे शक्य होत नाही.मात्र हळदी कुंकू तसेच काही कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला वर्ग एकत्र आल्या.

यावेळी महिलांकडून संगित खुर्ची,फुगडी, नृत्य आदी विविध खेळ खेळण्यात आले. विशेष म्हणजे या खेळासाठी मोल्यवान तसेच गृहपयोगी वस्तू बक्षिस म्हणून ठेवण्यात आले होते.आज घर सांभाळता तारेवरची कसरत करावी लागत आहे.मात्र महिला वर्ग आज शिक्षणात पुढे आहे.शिवाय कुटुंबाची सर्व जबाबदारी पार पाडत आहे.मुलांचे शिक्षण समवेत संसार सांभाळण्याचे मोठे धाडस तिच्यामध्ये निर्माण झाल्याचे दिसून येते.शिवाय कौटुंबिक जिवन जगत असतांना विविध समस्या येत असतात. मात्र त्यास न डगमगता त्या आपले काम यशस्वीपणे करत असतात,असे मार्गदर्शन संजना दळवी,यांनी या समारंभात व्यक्त केले.

यावेळी श्री शारदा अभिनव प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित अध्यक्षा आश्विनी पिंगळे, उपाध्यक्ष – मंदा कुरुंगळे,कार्याध्यक्षा – मनिषा साळुंखे,सचिव अनघा आमले, सहसचिव – संजना दळवी,खजिनदार- निलम शिंदे,सहखजिनदार – स्वप्नानी लभडे ,सद्स्यां सुषमा मुंढे,मोनिका जाधव,ज्योती बुरुमकर, समिक्षा मोरे आदि उपस्थित होत्या.

माजी उप सरपंच जया जाधव,सीआरपी – कमल जाधव, बचत गट – वर्षा जाधव, कल्याणी जाधव,मीना पाटील ,अस्मिता पाटील,भाग्यश्री पाटील,शारदा जाधव, सारिका जाधव,अंजली जाधव,पद्मा जाधव, शितल जाधव,प्रियंका जाधव,मनिषा जाधव, त्याच बरोबर गावातील महिला वर्ग उपस्थित होत्या.

या संस्थेच्या माध्यमातून आम्ही महिला वर्गास सहकार्य करण्यासाठी सज्य आहोत महिला स्वावलंबी व्हावे यासाठी आम्ही बचत गटास सहकार्य करून तुम्ही तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी प्राधान्य दिले जाईल

श्री शारदा अभिनव प्रक्रिया सह संस्था मर्यादित सह सहसचिव – संजना दळवी

महिला वर्ग सक्षम होण्यासाठी आम्ही महिला एकत्र ऐवून या संस्थेची स्थापना केली आहे.महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे हाच त्या मागील उद्देश आहे. ‌ मोनिका जाधव- श्री शारदा अभिनव प्रक्रिया सह संस्था मर्यादित सद्स्या

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.