खालापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी कृष्णाशेठ पारंगे
सिटी बेल | मोहोपाडा | राकेश खराडे |
रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यातील खालापूर, उरण, पनवेल अशा तीन तालुका अध्यक्षांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (MPCC ) कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत व रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयात करण्यात आली.
यावेळी खालापूर,पनवेल, उरण तालुक्यात नवतरूणांना नियुक्तीपत्र देऊन तालुका अध्यक्षपदांची धुरा सोपविलेली आहे.
यामध्ये खालापूर तालुका अध्यक्षपदी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा पारंगे यांची निवड करण्यात आली आहे.

उरण विधानसभा मतदार संघात येत असणाऱ्या उरण,पनवेल,खालापूर तालुक्यात तडफदार तालुका अध्यक्षाची निवड केल्याने या मतदार संघात काॕग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून नवतरूणांना हवेहवेसे असणारे अध्यक्ष मिळाल्यामुळे उत्साहाचे वारे घोंगावताना पहावयास मिळत आहेत.
खालापूर तालुक्याच्या अध्यक्ष स्थानी वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा पारंगे यांची वर्णी लागल्यामुळे तालुक्यात काॕग्रेसला नविन उर्जा मिळाली आहे.
कृष्णा पारंगे यांची राजकीय क्षेत्रात चागली पकड असून वासांबे ग्रामपंचायतीचे सरपंच पदाची धुरा अतिशय चांगल्या प्रकारे करुन अनेक समाजपोयोगी कामे झालेली आहेत व सूरू सुध्दा आहेत.तसेच त्यांच्या धर्म पत्नी कांचन पारंगे यांनी चांभार्ली पंचायत समिती गणातून निवडणूक लढवून विजयी पताका फैरावली होती.

याच वेळी राजकीय क्षेत्रात असलेल्या अनुभवातून त्यांनी कांचन पारंगे यांना खालापूर पंचायत समितीच्या सभापती पदावर विराजमान करण्यासाठी मोठे यश प्राप्त झाले होते. सभापती पदावर विराजमान होताच अनेक सामाजिक कामे परिसरात केलेली आहेत.
नागरिकांच्या समस्या सोडवून परिसरात कृष्णा पारंगे यांच्या पारंगत नेतृत्वामुळे चमकदार छवी असल्याने पक्षाने दिलेली जवाबदारी योग्यरीत्या निभाऊन खालापूर तालुक्यात काॕग्रेस पक्ष बलकट होण्यासाठी मदत होईल असा सर्वसामान्य माणसाला विश्वास असल्यामुळे त्यांची खालापूर तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड होताच तालुक्यातील अनेक नागरिकांनी पदाधिका-यांनी कृष्णा पारंगे यांची रिस येथील निवासस्थानी भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
कृष्णा पारंगे यांची खालापूर तालुका काॕग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment