सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
मोहोपाडा येथील प्रिआ स्कुलने इयत्ता दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा सत्ताविसाव्या वर्षीही कायम राखली आहे. यावर्षी परीक्षेसाठी एकूण 106 विद्यार्थी बसले होते. त्यातील 51 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले तसेच पहिल्या श्रेणीमध्ये 50 विद्यार्थी व दुसऱ्या श्रेणीत 5 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी पुढीलप्रमाणे
1) तरुण प्रकाश परिहार = 93.00%
2) खुशी किशोर म्हात्रे = 92.80%
3) संतोष लक्ष्मीप्रसाद धमाल = 92.40%
मोहोपाडा प्रिआ स्कूलमधील दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुयश संपादन करून प्रिआ स्कुलचे नाव अभिमानाने उंचावले आहे. प्रिआ स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. जोसी जोसेफ मॅडम, प्रिआ स्कुल कमिटीच्या चेअरमन सौ. उल्का धुरी व सर्व सदस्य यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व पालकांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






Be First to Comment