अलिबाग गडावर नागरिकांचे प्रश्न सुटतील : अमित ठाकरे
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
छत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड वरून जिल्ह्याचे नाव रायगड ठेवण्यात आलेले आहे. रायगड जिल्ह्याचा इतिहास ज्वाजल्य आहे. त्यामुळेच जिल्ह्यात मनसेची ताकद असून केवळ सत्तेसाठी नाही तर अलिबागमध्ये उभारलेल्या मनसे अलिबाग गड कार्यालयात जनतेचे प्रश्न सुटतील याचे समाधान असल्याचे प्रतिपादन मनसे नेते अमित ठाकरे यांनी केले. अलिबाग शहरात नव्याने निर्माण अलिबाग गड मनसे कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्माण केल्यापासून रायगड जिल्ह्यात पक्षाने आपले पाय घट्ट रोवले आहेत. तरुणांमध्ये आजही मनसेची क्रेझ आहे. तर पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा महाराष्ट्रात कुठेही असली तरी होणारी गर्दी आणि जे सभेला जाऊ शकत नाही त्यांची टिव्ही समोरील गर्दी होऊन ते सभा संपेपर्यंत खिळून राहतात असे आजवरचे चित्र आहे. मागे काही अंशी पक्षाला आलेली मरगळ झटकून पक्ष पुन्हा एकदा कामाला लागला आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरात जिल्हा उपाध्यक्ष महेश कुन्नूमल यांच्या पुढाकारातून अलिबाग मुरुड विधानसभा मदारसंघाचे पक्षाचे कार्यालय अलिबाग गड म्हणून उभे राहिले आहे. त्याचे उद्घाटन मनसे पक्षाचे नेते राजपुत्र अमित ठाकरे व आमदार राजू पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. कोरोनाचे नियम पाळत करण्यात आलेल्या या उद्घाटन सोहळ्यात ढोल ताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
तर ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न हे राजगडावर सोडवले जातात तसेच येथील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना या अलिबाग गडावर महेश कुन्नूमल v सहकारी यांच्या माध्यमातून वाचा फोडून त्यांना न्याय दिला जाईल असे ठाकरे यांनी उद्गार काढले. तर जिल्ह्यात मनसेची ताकद वाढत असून जनतेचा वाढता पाठिंबा पक्षाला मिळत आहे.
अनेक ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते हे जोमाने काम करीत असल्याने जिल्ह्यात मनसेचा झांजावात निर्माण झाला असल्याची भावना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी अमित ठाकरे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तरुणांनी एकच गर्दी केली मात्र त्या सर्वांसोबत ठाकरे यांनी फोटो सेशन केल्याने तरुणाई भलतीच खुश होती.
मनसे नेते अमित ठाकरे, कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजू पाटील, मनसे महिला आघाडी उपाध्यक्षा स्नेहल जाधव, रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, महिला जिल्हा अध्यक्ष सपना देशमुख, नवीमुंबई मनसे गजानन काळे, उपजिल्हा अध्यक्ष महेश कुंनुमल, तालुकाध्यक्ष मुरलीधर पाटील, श्याडो कॅबिनेट सदस्य देवव्रत पाटील, महिला अलिबाग तालुकाध्यक्ष शर्मिला कुण्णूमल, उपतालुकाध्यक्ष अर्चना नाईक, महिला शहराध्यक्ष कांचन पाटील, शहराध्यक्ष थळकर, विभाग अध्यक्ष सिधू म्हात्रे, मल्हार कुंनुमाल, नितीन पाटील, अनिता गुंजाळ, आरती म्हात्रे, ओवी पाटील, पल्लवी बेलास्कर आदींसह मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment