बेस्ट टिचर अँवाँर्ड विजेते सहदेव कापसे यांचा विशेष सन्मान
सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
अविष्कार फौंडेशन सामाजिक व एज्युकेशनल संस्था कोल्हापूर यांच्या वतीने बेस्ट टिचर अँवाँर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेले बेस्ट टिचर सहदेव कापसे
यांचा खा. सुनिल तटकरे यांच्या हस्ते रोहे तालुक्यातील वरसगाव ग्रा.पंचायतीचे वतीने
संपन्न झालेल्या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला आहे.
ग्रा.पंचायत वरसगाव यांच्या वतीने विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा खा.सुनिल तटकरे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमातंर्गत वरसगाव प्रा.शाळा तिसे येथील विषय शिक्षक व वरसगाव गावचे सुपुत्र व बेस्ट टिचर अँवाँर्ड विजेते सहदेव कापसे यांचा शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आहे.
जि.प.सदस्य दयाराम पवार रोहा पं. स.सदस्या सिद्धि राजिवले मा.पं.स.माजी सभापती सुनिता महाबळे जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर,गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे
जेष्ठ नेते प्रकाश थिटे,नारायण धनवी,बाबूराव बामणे, तालुका महिला अध्यक्ष प्रितम पाटील,,जि.प.गट अध्यक्ष नरेंद्र जाधव, पं.स.गण अध्यक्ष मनोज शिर्के,राकेश शिंदे,संजय राजिवले,पंचक्रोशीतील सर्व सरपंच यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.








Be First to Comment