Press "Enter" to skip to content

अमित ठाकरे यांच्या हस्ते पेणगड कार्यालयाचे उद्घाटन

पेण तालुकाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या पाठीशी मनसे — आमदार राजु पाटील

सिटी बेल| पेण | वार्ताहर |

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पेण तालुक्याच्या वतीने पेणगड या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी रूपेश पाटील यांच्यावर सोपविल्यानंतर त्यांनी पक्षाच्या दृष्टीकोनातून चांगले काम करीत असंख्य शेतकरी, कामगार, श्रमजीवी, मजूर यांच्या समस्या सातत्याने सोडवीत आपली ओळख निर्माण केली आहे.

रुपेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून पेणगड या तालुका जनसंपर्क कार्यालयातू यापुढे तालुक्यातील नागरीकांचे विविध प्रश्न सोडविण्यात येतील रुपेश पाटील यांच्या कार्याचा गवगवा वाढत असल्याने त्यांच्या पाठीशी संपूर्ण मनसे पक्ष असल्याचे यावेळी आमदार राजु पाटील यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सपना पाटील, पेण शहर अध्यक्षा निकिता पाटील, नितिन पाटील, सुरेश संसारे, हनुमान नाईक, ऋषिकेश कोळी आदिंसह असंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.