Press "Enter" to skip to content

रेल्वे सुरक्षा दलाची कर्तव्यदक्षता

गोरखपूर ट्रेन मधून पर्स खेचून पळून जाणार्‍या चोरट्याला रेल्वे सुरक्षा बलाने पकडले

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

पनवेल – गोरखपूर ट्रेन मधून पर्स खेचून पळून जाणार्या चोरट्याला मंगळवारी रेलेव सुरक्षा बलाच्या उप निरीक्षक रेणु पटेल आणि  त्यांच्या सहकार्यांनी पाठलाग करून पकडले . त्याच्याकडून पर्स आणि चोरलेला मोबाईल हस्तगत केला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रेल्वे  सुरक्षा बलाच्या उप निरीक्षक रेणु पटेल, सहायक उपनिरीक्षक विजय गोरे, हवालदार विशाल कवले, शिपाई एस एन सैनी हे  पनवेल स्टेशन वरील फलाट क्रमांक 7 वर गोरखपूर ट्रेनची तपासणी करत होते. त्याचवेळी कोच नंबर 3 डी मधून  चोर, चोर पकडा  असा आवाज आल्याने त्यांनी तिकडे धाव घेतली असता एक व्यक्ती पळत असताना दिसली. त्याचा पाठलाग केला असता ती व्यक्ती रोहा – दिवा गाडीत चढली त्याला पकडून रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यलयात आणले.

त्याठिकाणी त्याची चौकशी केली असता त्याचे नाव विशाल यादव  ( वय 25 वर्षे ) असल्याचे समजले. त्याची तपासणी केली असता  त्याच्या जवळ निळ्या रंगाचा 28 हजार रूपये किमतीचा  सैमसंग -9   फोन सापडला. त्याच्यावर  कामोठे येथील  जाफर इम्रान फक्रुल हसन  या व्यक्तीचा फोन आला. त्याला बोलवून घेण्यात आले.

त्याच वेळी संतोष रामेश्‍वर प्रसाद , रा. करंजाडे  तेथे आले . त्यांनी आपली पर्स गोरखपूर ट्रेन कोच नंबर 3 डी मधून खेचून नेल्याची तक्रार केली. त्यानी तेथे असलेल्या आरोपीला ओळखले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आपली पर्स सापडल्याबद्दल त्यांनी उप निरीक्षक रेणु पटेल व त्यांच्या  सहकार्यांना धन्यवाद दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.