‘मातृभाषा’हे जीवन जगण्याचा राजमार्ग : डॉ. रविकांत शिंदे
सिटी बेल | श्रीवर्धन | केतन माळवदे |
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशान्वये, श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालय ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ चे यशस्वी आयोजन केले. समारोपाच्या व्याख्यानात डॉ. शिंदे यांनी मराठी मातृभाषा ही उत्कृष्ट जगण्याचा राजमार्ग असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात निबंधलेखन, काव्यलेखन व कथालेखन या कार्यक्रमाने झाली व त्या नंतर आभासी व्याख्यानमालेचे आयोजन केले. पहिल्या व्याख्यानात ‘कुंकू ते दुनियादारी’ चे लेखक डॉ. राजेंद्र थोरात यांनी ‘साहित्य व सिनेमा’ या विषयास अनुसरून कोणत्याही सिनेमाचा पाया‘पटकथा’ असते आणि इतर भाषेतील सिनेमांमध्ये मराठी शब्द शब्दांचा वापर होणे ही सुखद बाब असल्याचे नमूद केले.
डॉ. संजय मोरे यांनी ‘माझी मराठीची बोलू कौतुके’ या विषयावर मराठी भाषेचे वैभव विशद करून मराठी भाषा संदर्भात संत, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी यांनी मराठी भाषेला प्राधान्य देण्याविषयाची पावले उचलल्याचे सांगितले. सोबतच मोबाईल मुळे वाचन संस्कृती हरवत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
‘मराठी भाषेच्या विकासाचे आव्हानआणि उपाय’या विषयांतर्गत जागतिकीकरण, इतर भाषेचा प्रभाव, भाषेला विशिष्ट चौकटीत ठेवणे आणि अभिजात भाषेचा दर्जा नसणे ही मराठी भाषा समोरील आव्हाने असल्याचे सांगितले. आणि त्यावर मराठी भाषेचे ब्रँड मूल्य, वाचन संस्कृती वाढविणे, तंत्रज्ञानाची भाषा करणे,सर्वांगीण कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर आणि मराठी ज्ञानभाषेचा दर्जा दिल्यास मराठी भाषेचा विकास होईल अशी उपाययोजना सुचवल्या.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालय व्यवस्थापन समिती, आय.क्यू.ए.सी आणि प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी तसेच संस्थेचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत व परिचय प्रा. शंकर भोईर व प्रा. संतोष लंकेश्वर यांनी केले .







Be First to Comment