श्रीवर्धन महाविद्यालयातील प्रा.योगेश लोखंडे यांना पीएचडी पदवी प्रदान
सिटी बेल | श्रीवर्धन | केतन माळवदे |
येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या अर्थशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले व श्रीवर्धन तालुक्याच्या अत्यंत ग्रामीण अशा खारगाव या गावातील सुपुत्र योगेश यशवंत लोखंडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त केली असून त्यांच्या संशोधनाचा विषय, ” ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकामार्फत होणाऱ्या गृहकर्ज योजणांचा प्रभाव व परिणाम एक अवलोकनात्मक अध्ययन – ( कालावधी १९९१ते २०१२) हा होता.

या कामी त्यांना शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गोखले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी, सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच श्रीवर्धन तालुक्यातील अनेक मान्यवर आणि नागरिक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. योगेश लोखंडे हे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.








Be First to Comment