Press "Enter" to skip to content

संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियान व १५ व्या वित्त आयोग निधीतून वाटप

रोठ ग्रा.पंचायतीतर्फे कचरा कुंड्यांचे वाटप

सिटी बेल | खांब-रोहा | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील रोठ खु.ग्रा.पंचायतीचे वतीने कचरा कुंडी वाटपाचा कार्यक्रम ग्रा. पंचायत सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.

संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियान या उद्दिष्टांनुसार व १५ वित्त आयोग निधीतून सदर कचराकुंडींचे वाटप सरपंच गीता मोरे व उपसरपंच सुनीता मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदस्य सचिन मोरे,राकेश मा.मोरे,महेंद्र कांबळे,हर्षाली कांबळे, सुनीता डाके,जनार्दन मोरे, सामाजिक कार्यकर्ते लिलाधर मोरे,हरिश्चंद्र मोरे,प्रकाश डाके,मंगेश मोरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ग्रा.विस्तार अधिकारी डी.एच.सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तर १५ वित्त आयोग अंतर्गत ग्रा.पंचायतीने राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे महिला वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.