Press "Enter" to skip to content

महिलांनी शाई फेकून केली होती धक्काबुक्की

अमरावती महापालिकेचे आयुक्त आष्टीकर यांच्यावरील शाइफेक प्रकरणी उरण नगरपालीका कर्मचाऱ्यांकडून निषेध

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

अमरावती महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी यांच्यावर महिलांनी शाई फेकली व धक्काबुक्की करून हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा उरण नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी निषेध करून आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही चिंताजनक असून याचा सर्व थरातून निषेध होणे आवश्यक आहे. राज्यातील सर्वच नगरपरिषदा, नगरपंचायती, महानगरपालिका मधील कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज उरण नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच या प्रकरणी हल्ला करणाऱ्या महिला, पुरुष व या संबंधीत सर्व पदाधिकाऱ्यांना त्वरित अटक करून त्यांना कडक शिक्षा होण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी उरण नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या हल्लाचा निषेध केला.

यावेळी मुख्याधिकारी संतोष माळी, सुरेश पोसतांडेल, संतोष पवार, झुंबर माने, मधुकर भोईर, किशोर तेलंगे, मनोज उभारे आदींसह कामगार संघटनेचे पदाधिकारी व नगरपालिका कर्मचारी आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.