१४ लाखाची विदेशी बनावट स्कॉच जप्त : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई
सिटी बेल | पनवेल | संजय कदम |
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमध्ये इको व एक दुचाकी वाहनासह अवैध विदेशी बनावट स्कॉच मद्याचा साठा करणार्यांवर कारवाई करून सदर मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ई विभाग ठाणे यांना खात्रीलायक बातमी मिळाल्या वरुन निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी / भरारी पथक ठाणे विभाग / विभागीय भरारी ’पथक ठाणे / निरीक्षक, पनवेल शहर. असे सर्वजण मिळुन सरकारी वाहन क्रमांक एमएच-01-डिए-5083 या वाहनाने तुर्भे रेल्वे स्टेशन समोर येथे बनावट विदेशी मद्याच्या वाहतुकीवर पाळत ठेवुन छापा घातला असता.
आरोपीनामे सुनिल शांतीभाई वाघेला वय 35 वर्षे, राह.- रु.नं. 106 1/03 डॉ. झाकीर हुस्सेन चाळ धारावी क्रॉस रोड, रॉयल बॅकरी महाराणा प्रतापनगर डोलवाडा धारावी मुंबई, उमेश जितेंद्र दुबे वय 33 वर्षे राह.- सहयोग को-ऑप-सोसायटी लि. डी-बी. 15 रु.नं. बी-4, म्हाडा कॉलनी, गणेश नगर कांदिवली (प.) मुंबई, एक 15 वर्षीय विधी संघर्ष गस्त बालक राह.- हरिश्चंद्र गणा पाटील, प्लॉट नं. 248, तुर्भे गाव, यांच्या ताबे कब्जातून एक काळ्या पिवळ्या रंगाची सुझुकी कंपनीची इको (टॅक्सी व्हॅन) एमएच-02- बीक्यु-8083 मधुन 05/1000 मिली. क्षमतेच्या बनावट स्काँच मद्याच्या सिलबंद बाटल्या, 50/1000 मिलीच्या विविध ब्रॅन्डच्या रिकाम्या बाटल्या व दोन मोबाईल संच मिळुन आले.
त्या नंतर त्यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या भाडेत्वावर घेतलेल्या घरात रु.नं. 004 हाऊस नं. 63 अनंत निवास प्लॉट नं. बी-173, सेक्टर-19, कोपरखैरणे नवी मुंबई जि.- ठाणे. येथे छापा टाकुन विदेशी बनावट स्कॉचच्या 48/1000 मिली., 02/2000 मिली., 03/700 मिली क्षमतेच्या विविध ब्रॅण्डच्या बनावट स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्या आढळुन आले. 857/1000 मिलीच्या रिकाम्या बाटल्या, 800 विविध ब्रॅण्डचे लेबल. 02 ड्रायर व 02 टोचे. असे सर्व दोन पंचा समक्ष झडती घेतली असता मिळुन आले.
असे एकुण त्यांच्या कब्जात मिळुन आला यानंतर बजरंग बॅकरी समोर साईबाबा मंदिरा जवळ तुर्भेगाव सेक्टर-22 नवी मुंबई जिल्हा-ठाणे. येथे एक पांढर्या रंगांची अँक्टीव्हा वाहन क्र. एमएच-43-एयु-2263 व विदेशी मद्याचा 04/1000 मिलीच्या बाटल्या व एक मोबाईल असे एकुण अवैद्य विदेशी बनावट स्कॉचचा असा एकंदर रुपये 14,25,240/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई कांतीलाल उमाप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई. श्रीमती. उषा राजेंद्र वर्मा संचालक, (अमलबजावणी व दक्षता) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, सुनिल चव्हाण विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग ठाणे. निलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे विभाग, श्रीमती. शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अलिबाग विभाग सी. एच. हांडे, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एस. गोगावले, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ई विभाग ठाणे. एन. एच. गोसावी, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ई-2 विभाग ठाणे., संजय राठोड दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ई-1 विभाग ठाणे आर. के. शिरसाठ, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग ठाणे. नंदकुमार मोरे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक ठाणे. अनंत कांबळे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक ठाणे. संजय पुरळकर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल शहर. विजय धुमाल निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक ठाणे. शिवाजी गायकवाड दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल शहर, कदम दुय्यम निरीक्षक, राजूय उत्पादन शुल्क, डी विभाग ठाणे. संदिप पाटील जवान, ज्योतिबा पाटील, श्रीमती. एन. जी. लांडे, महिला जवान, लोढी, राणे, नानासाहेब शिरसाठ, धुमाल, पालवे, श्रीमती. रमा कांबळे महिला जवान, विलास चव्हाण, विशाल सुतार वाहन चालक सचिन कदम वाहनचालक यांनी सोबत हजर राहुन मदत केली. सदरील गुन्ह्यांचा पुढील तपास निलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे विभाग, व यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राठोड दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ई-1 विभाग ठाणे हे करत आहेत.
Be First to Comment