सिटी बेल लाइव्ह / मुकुंद रांजाणे / माथेरान #
एमएमआरडीए च्या माध्यमातून अनेक ठिकाणी विकास कामे सध्या युद्धपातळीवर सुरू असून यातील महत्वाचा असणाऱ्या एको पॉईंटच्या सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी माथेरान नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत केली आहे.
पाच पॉईंटच्या सर्कल मधील एको पॉईंट हा एक विलोभनीय मुख्य पॉईंट आहे.ग्याबियन वॉल त्याचप्रमाणें क्ले पेव्हर मध्ये ही कामे पूर्ण केली जात आहेत. लॉक डाऊन काळात इथल्या युवकांना यानिमित्ताने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.लवकरच ही कामे पूर्ण होऊन लॉक डाऊन संपल्यावर पर्यटन हंगामाला गती प्राप्त होताच इथल्या व्यावसायिकांना चांगल्या प्रकारे उत्पनाचे साधन प्राप्त होणार आहे.
यावेळी प्रसाद सावंत यांच्या सोबत वनसमितीचे कार्यक्षम सदस्य लक्ष्मण कदम, सुभाष भोसले, विजय सावंत,जेष्ठ पत्रकार दत्ता शिंदे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.






Be First to Comment