Press "Enter" to skip to content

भाजपच्या पुढाकाराने माथेरानच्या स्मशानभूमीत श्रमदान

माथेरान स्मशानभूमीतील अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडांचा तुटवडा दूर

सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान |

परिपूर्ण जंगलाने व्यापलेल्या माथेरान मध्ये असलेल्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यविधी साठी लागणाऱ्या लाकडांचा तुटवडा लक्षात घेता भारतीय जनता पक्षाच्या समस्त कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी लाकडे गोळा करण्यासाठी श्रमदान करण्यात येणार आहे अशी सोशल मीडियावर साद घातल्यानंतर गावातील विविध संस्थेच्या, मंडळांच्या सदस्यांनी धाव घेत भाजपच्या हाकेला साद देत मोठया प्रमाणावर पडलेले लाकडाचे ओंडके आणि सर्व सुके सरपण गोळा करून स्मशानभूमीत व्यवस्थित ठेवले आहे.

दोन हातगाड्या मधून याठिकाणी
जवळपास पंधरा टन लाकडांचा साठा केल्यामुळे आगामी काळात अंत्यविधी वेळी लाकडांचा तुटवडा भासणार नाही.देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असताना मशिनरीच्या एका बटनावर प्रेताची विल्हेवाट लावली जाते. येथील स्मशानभूमीत पाच वर्षांपूर्वी नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून याठिकाणी वास्तू उभारून डिझेल वर चालणारी शव दाहीनी बसविण्यात आलेली आहे परंतु ही मशिनरी नेहमीच बंद अवस्थेत असल्याने अंत्यविधी वेळेस खूपच अडचणी निर्माण होत होत्या.

संबंधीत खात्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे नागरिकांची ही महत्त्वपूर्ण समस्या दूर करण्यासाठी येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रमदानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला त्यास सर्व स्तरातून उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला अनेक हात यासाठी पुढे आले.

यावेळी भाजपचे अध्यक्ष प्रवीण सकपाळ, सरचिटणीस राजेश चौधरी,किरण चौधरी, माजी उप नगराध्यक्ष आकाश चौधरी,माजी नगरसेवक प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव, संदीप कदम, धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे,जनार्दन पार्टे,संजय भोसले यांसह अन्य नागरिक,हॉटेल कामगार सुध्दा स्वेच्छेने या सेवाभावी उपक्रमात सहभागी झाले होते.भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केलेल्या या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.