Press "Enter" to skip to content

रमाबाई आंबेडकर यांची 126 वी जयंती साजरी

माता रमाईचे आदर्श प्रत्येक स्त्रीने जोपासले पाहिजे – प्रकाश गायकवाड

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

भारतीय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय अलौकिक योगदानाला आधाराची संगत देत घराचे घरपण राखून ठेऊन आणि आपल्या मूलभूत सुखांचे त्याग करून स्त्रियांसाठी आदर्श असलेल्या रमाबाई आंबेडकर यांची 126 वी जयंती सम्यक सामाजिक संस्थेच्या कार्यालयात साजरी करण्यात आली.

तसेच आपण आपली पुढील पिढी घडविण्यासाठी आपल्या मुलांना सामाजिक कार्यक्रमाची आवड निर्माण करून द्यायला हवी असे मोहन कांबळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

यावेळी माता रमाईच्या जीवन चरित्राचा आढावा देत समाजाने त्यांचा आदर्श घेऊन सामाजिक चळवळ जागृत ठेवली पाहिजे असे अजित कडलक यांनी आपले मनोगत मांडताना सांगितले. तसेच डॉ. बाबासाहेबांनी आपल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. या अधिकारांचा गाडा सतत चालु राहण्यासाठी आपण गटातटात विखरून न जाता संघटित राहिल्यास त्यांचे स्वप्न नक्की पूर्ण करू शकतो असेही कडलक यांनी यावेळी सांगितले.

याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांनी सांगितले की, “स्त्री मुळे घराला घरपण येते” या उक्तीप्रमाणे माता रमाईचे आदर्श प्रत्येक स्त्री ने जोपासले तर कर्तृत्ववान पुरुषाला समाजकार्यात योग्य रीतीने वाटचाल मिळू शकते. यासाठी घरात स्त्री असेल तर सर्वकाही आहे असे उदाहरण देत रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले मत मांडले.

या कार्यक्रमाचे मल्ल सांभाळून बाबासाहेबांची वंशावळ सादर करून बाबासाहेब आणि रमाई यांच्या ऐतिहासिक जीवनावरील आढावा सांगत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार पाडले.

यावेळी या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड, अजित कडलक, मोहन कांबळे, तायडे सर, जावळे, पाचपिंडे, निकाडे आदींसह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.