Press "Enter" to skip to content

जय प्रेसिजन प्रोडक्ट इंडिया प्रायव्हेट लि यांच्या विद्यमाने

रसायनीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पोलिस ठाणे आणि जय प्रेसिजन प्रोडक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान राबविण्यात आले.

यावेळी रसायनी पोलिस ठाण्याच्या वतीने हेल्मेट वापरा, वाहतुकीचे नियम पाळा, पोलिसांना सहकार्य करा असे सांगण्यात आले.रसायनी पोलिस ठाण्याजवळच सिध्देश्वरी पराडे रस्त्यावर जय प्रेसिजन कंपनीचे पदाधिकारी आणि रसायनी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांच्याहस्ते रस्त्यावरुन दुचाकी घेऊन जाणा-या दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप करण्यात आले.

यावेळी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचे महत्व वाहनचालकांना सांगण्यात आले.वाहन चालविताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले.

यावेळी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज दत्तात्रेय गुंड,पोलिस नाईक मंगेश लांगी, पोलिस नाईक विशाल झावरे, पोलिस भुपेश वेल्हे आदींसह महिला पोलिस कर्मचारी व जय प्रेसिजन कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.