रोहा नागोठणे भिसे खिडीतील डेंजर झोन वळणामुळे संरक्षक भिंतीचे काम युध्दपातळीवर सुरु
सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे |
रोहा – नागोठणे भिसे खिडीवरुन जाणारा मार्ग म्हणजे प्रवाशी वर्गाला या खिंडीतील नागमोडी वळणावरुन वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या मार्गावर असलेल्या वळणावर नेहमीच अपघात घडत असतात. या डेंजर झोनमधील अपघाताची मालिका थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम प्रशासनाला उशिरा का होईना प्रवाशी वर्गात समाधानाचे वातावरण दिसुन येत आहे.

या रोहा नागोठणे रस्त्याचे संरक्षण भितीचे काम युध्दपातळी सुरु करुन नागोठणे खिडीतील एकुण दोनशे मीटर लांबीच्या रस्ताचे काम नुकतेच सुरु झाले असुन शासनाच्या अपघात प्रतिबंधक योजनेअंतर्गत सदर काम होणार आहे. या कामासाठी सुमारे एकेचाळीस लाख रुपये खर्च होणार असुन सतरा ते अठरा मीटर संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दरीच्या बाजुला साईडपट्टी व डोंगर बाजूला पावसाळ्यात डोंगरातुन येणा-या पाण्याला मार्ग मोकळा करुन देण्यासाठी खोलगट गटार लाईन काढण्यात आली आहेत.

या खिंडीत अनेक नागमोडी वळणे असुन ते अतिशय धोकादायक आहेत. या धोकादायक वळणावर काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात एक ट्रक खोल दरीत कोसळुन चालक व वाहक यांचा जागीच मृत्यृ झाला होता. या खिंडीतील अनेक डेंजर झोन वळणा मधील संरक्षक भिंतीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आल्याने प्रवाशी नागरिकांमधुन व चालकांकडुन समाधान व्यक्त होत आहे.
अपघाती वळणावर संरक्षण भिंतीचे बांधकाम होणे गरजेचे होते त्या पध्दतीची वाहन चालक व प्रवाशी वर्गातुन मागणी देखील होती. या कामाचा दर्जा उत्तम पध्दतीचा असणार याकडे आमचे बारकाईने लक्ष असणार व सदर काम नियोजित वेळेत पुर्ण होणार अशी प्रतिक्रीया रोहा सार्वजनिक बांधकाम विभाग रोहा उपअभियंता एम.एम.घाडगे यांनी दिली.








Be First to Comment