रोहा तालुक्यातील शे.का.प. नेते अनंता वाघ यांचा जात प्रमाणपत्र ठरले अवैद्य
सिटी बेल | नागोठणे | याकूब सय्यद |
रोहा तालुक्यातील कोंडगाव या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा शेकापचे ज्येष्ठ नेते अनंत आत्माराम वाघ यांचे जात प्रमाणपत्र अखेरीस जात पडताळणी समिती अलिबाग-रायगड यांनी अवैध ठरविले आहे. असा दावा कोंडगाव गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा धामणे यांनी केला.
अनंत आत्माराम वाघ यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार कोकण विभागीय अधिकारी यांच्याकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी केली होती. चौकशी अंती सदर जात प्रमाणपत्र हे अवैद्य असल्याचा निष्पन्न झाले आहे. श्रीकृष्ण धामणे यांनी कोकण विभागीय अधिकारी तसेच जात पडताळणी समिती अलिबाग रायगड यांच्याकडे तक्रार नमूद केली त्यानंतर हाती आलेल्या निकालातून स्पष्ट झाले आहे.
तालुका रोहा जिल्हा रायगड येथील कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक दिनांक 15 /01 /2021/ रोजी झाली होती त्यावेळी अनंत आत्माराम वाघ या व्यक्तीने प्रभाग क्रमांक दोन (2 ) मधून ना मा प्र वर्ग खुला जागेसाठी निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक लढविली त्यावेळी जात प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्र सादर केला होता. त्या अनुषंगाने खोटे सादर केलेल्या जात प्रमाणपत्र ची सखोल चौकशी करिता कोंडगाव गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्ण धामणे यांनी कोकण विभागीय अधिकारी तसेच जात पडताळणी समिती अलिबाग रायगड यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केले.

त्या अर्जामध्ये निवडणूक उमेदवार अनंता आत्माराम वाघ यांनी जे जात प्रमाणपत्र जोडले आहे ते खोटे आहे. त्यांचे शाळा सोडल्याचे दाखले पाहता अनंता आत्माराम वाघ यांनी पहिली ते चौथी शिक्षण प्राथमिक शाळा कोंडगाव येथे घेतले असून त्या शाळेच्या रजिस्टरमध्ये जातीची नोंद हिंदू मराठा जात असताना अनंत वाघ यांनी कागदोपत्री हिंदू कुणबी 83 असे शाळा सोडल्याचे दाखल्यात खोटा उल्लेख केलेला आहे. तसेच अनंत वाघ यांनी पुढील शिक्षण नागोठणे गुलाबाई रामनिवास अग्रवाल विद्यामंदिर येथे घेतले असे दाखविले आहे. त्या शाळेचे दाखले पाहिले असता शालेय सोडल्याच्या दाखलेत हिंदू-मराठा जातीची नोंद आहे. असे शाळा सोडली दाखल्यात दिसत असताना हिंदू कुणबी 83 असा जातीचा खोटा उल्लेख केलेला दिसत आहे.
त्यानंतर गाव नमुना 14 नागोठणे तालुका रोहा येथील दाखला सण 1968 दिनांक 25/ 11/ 1968 रोजीचा आन्या तान्या वाघ हिंदू असे असताना मुलाचे नाव व जातीचा उल्लेख नसताना अनंत आत्माराम वाघ या व्यक्तीने खोटा दाखला माहे नोव्हेंबर 1960 182/ दिनांक 25 /11 /1960 अनंत आन्या तान्या वाघ हिंदू कुणबी असा खोटा दाखला दिनांक 16/02/ 2004 रोजी घेतला. वास्तविक पाहता आन्या तान्या वाघ ही व्यक्ती मुळ मौजे गाव (वरप) तालुका पेन येथील रहिवाशी असताना व त्याचे महसूल सदरी 7/12 सात बाराला तशी नोंद असून त्याची पत्नी आनंदी आन्या वाघ मुलगा परशुराम आन्या वाघ धोंड्या आन्या वाघ अशी आहे.
अनंत वाघ याचे नाव अनंत आत्माराम वाघ व त्यांचे वडिलांचे नाव कैलासवासी आत्माराम मोरू वाघ व आजोबा चे नाव कैलास वासी मोरू गोपाल वाघ असे असून कै.आन्या तान्या यांचा कुटुंब वेगळा असताना मेहरबान तहसीलदार कार्यालयांमध्ये रोहा तहसील प्रतिज्ञापत्र केले ते दिनांक 18 /12 /2021 / रोजी केले असून त्या प्रतिज्ञापत्रात कैलास वासी आत्माराम मोरू वाघ व कै.आन्या तान्या वाघ या दोन व्यक्ती नसून एकच व्यक्ती आहे असे खोटे आढळून आल्यास भारतीय दंड अधिनियम कलम सहिता 119/ 200 व 293/2 अन्वय शिक्षेस मी पात्र राहीन याची मला जाणीव आहे असे लिहून दिले आहे व त्याच पद्धतीने अनंता वाघ यांची सखी बहीण लग्नापूर्वीचे नाव रंजना आत्माराम वाघ लग्नानंतरचे नाव सौ. विशाखा विकास महाडिक राहणार मुक्काम वावे पोटगे पोस्ट शेणवई तालुका रोहा जिल्हा रायगड हिने देखील त्याच पद्धतीने खोटे पेपर सादर करून निवडणूक लढवली सदरच्या खोट्या दाखल्याची तक्रार मी दिनांक 01/02/ 2021 रोजी मेहरबान जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अलिबाग-रायगड यांच्याकडे केली असता त्याची सुनावणी होऊन दिनांक 25 /1/ 2022 रोजी जात प्रमाणपत्र खोटा बनावट असल्याचा निकाल लागला असून शेकाप नेते अनंत आत्माराम वाघ यांचा हिदु कुणबी जातीचा दाखला पडताळणी समितीने खोटा असल्याचे जाहीर करून संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत.
सदरच्या खोट्या दाखल्यात 420 चा गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही जात प्रमाणपत्र कागदपत्र संदर्भात गांभीर्याने पाहिले असता एक गोष्ट लक्षात येते की एक बापाचे दोन मुलं असू शकतात हे खरं आहे परंतु दोन बापाचा एक मुलगा हे शक्य आहे काय? जो अति शहाणा त्याचा बैल रिकामा असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्ण धामणे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले त्यानंतर पत्रकारांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते अनंत आत्माराम वाघ यांना जात प्रमाणपत्रा संदर्भात दूरध्वनी द्वारे संपर्क करून विचारणा केली असता त्यासंदर्भात अनंत आत्माराम वाघ यांनी बोलण्यास नकार दिला.








Be First to Comment