दुधाच्या टॅंकर दुरुस्ती करत असताना टँकरला अचानक लागली आग
पत्रकार समाधान दिसले व गौरव दळवी यांच्या समयसुचकतेने अतिप्रसंग टळला
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
खालापूर तालुक्यातील हाँटेल बागेश्री जवळील विजय मोटार गँरेज मध्ये टँकरची गळती काढतांना लागलेल्या आगीत जिवीतहानी झाली नसली तरी टँकरची वित्त हाणी मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याचे समजते.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास टँकर क्रमांक एम.एच.०४/जे.के.६६४६ या टँकर चालकाने आपल्या टँकर मधील दूध ठरलेल्या ठिकाणी टाकून टँकरची गळती थांबावी म्हणून खालापूर तालुक्यातील हाँटेल बागेश्री जवळील विजय मोटार गँरेज मध्ये दुरूस्ती करण्यासाठी आपले वाहन लावले होते.

तर दुरुस्ती चालू असतांना अचानकपणे टँकरला आग लागल्याने गँरेज मालक व टँकर चालक यांना काहीच सुचेना असे झाले होते. मात्र याच वेळेला या गँरेज समोरून पत्रकार समाधान दिसले व गौरव दळवी हे खालापूर कडून खोपोलीकडे चालले असतांना त्यांना सदरचा प्रकार दिसला त्यांनी याबाबत तात्काळ खोपोली नगरपालिका अग्निशमन दल व खोपोली शहरातील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या टिमला सांगितले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अपघातग्रस्त टिम व खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. सदरची घटना समजताच खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.








Be First to Comment