Press "Enter" to skip to content

आरोपी विरोधात रायगड पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

डॉ. संजय सोनवणे यांना जीवे ठार मारण्याची धमकी

सिटी बेल | रायगड़ | धम्मशील सावंत |

लोकशक्ति संजीवनी प्रतिष्ठान चे संस्थापक,अध्यक्ष , ज्येष्ठ समाजसेवक, नामवंत उद्योजक डॉ. संजय सोनवणे यांना अर्वाच्य आणि अश्लील शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल माणगाव तालुक्यातील रुद्रवली येथील सिध्दार्थ धोंडीराम सोनावणे , सुधीर चिमाजी सोनावणे, शशिकांत रामचंद्र सोनावणे यांचे विरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी डॉ. सोनावणे यांनी केली आहे.

डॉ. संजय सोनवणे यांनी ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे त्यांच्यावर याआधीच पनवेल कोर्टात फौजदारी खटला दाखल असून ते सद्या तात्पुरत्या जामिनावर बाहेर आहेत. तर सदरील फौजदारी खटल्यातील डॉ. संजय सोनवणे हे फिर्यादी आहेत. त्यामुळे वरील फौजदारी खटला दाखल केला म्हणून मनात राग धरून आरोपी असलेले सिध्दार्थ धोंडीराम सोनावणे , सुधीर चिमाजी सोनावणे यांनी आज दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १.०० वाजताचे दरम्यान डॉ. संजय सोनावणे यांना अर्वाच्य व अश्लील भाषेत घाणेरडे शब्द वापरून शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.

सदर आरोपी यांचे पासून माझ्या जिवितास तसेच माझ्या कुटुंबीयांच्या जिवितास भयंकर धोका आहे अशी तक्रार सोनवणे यांनी पोलिस अधीक्षक अलिबाग यांना देण्यात आली आहे. मौजे रुद्रवली बौद्धवाडीत आरोपी सिध्दार्थ धोंडीराम सोनावणे यांचे घर डॉ. सोनावणे यांच्या घराजवळच असून माझ्या घरास आरोपी आग लावण्याची भिती वाटत आहे असे सोनावणे यांचे म्हणणे आहे.

तसेच त्यांची वयस्कर चुलती आणि त्यांचे कुटुंब गांवी राहत असून त्यांचे जीवितास सुध्दा धोका संभवत आहे तसेच सोनावणे हे कामानिमित्त प्रवास करत असतात त्यामुळे त्यांच्या खाजगी वाहनावर सुध्दा आरोपी इसम स्वतः किंवा मारेकरी यांचे मार्फत हल्ला करण्याची शक्यता निर्माण झाली आहे . तरी आरोपी इसम सिध्दार्थ धोंडीराम सोनावणे, सुधीर चिमाजी सोनावणे यांनी स्वतः शिविगाळ करून मला जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे . आणि त्यांना शशिकांत रामचंद्र सोनावणे याने पाठींबा देऊन साथ दिली आहे . तसेच आरोपी सिध्दार्थ याची पत्नी संगीता सिध्दार्थ सोनावणे हिने तिच्या पतीस याकामात साथ देऊन तिने सुध्दा शिविगाळ केली आहे .

वरील सर्व आरोपींनी शांतता आणि सुव्यवस्थेचा भंग करून इतर रहिवाशांना त्रास होईल असे बेकायदेशीर वर्तन देखील केले आहे . तरी आरोपी सिध्दार्थ धोंडीराम सोनावणे , सुधीर चिमाजी सोनावणे , शशिकांत रामचंद्र सोनावणे यांचे विरुध्द अर्वाच्य , अश्लील शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे , खूनाचा कट रचने इ . बाबत त्वरीत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी याकरिता पोलीस अधीक्षक अलिबाग यांना तक्रार देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.