काँग्रेसच्या उरण तालुका अध्यक्षपदी विनोद म्हात्रे
सिटी बेल | उरण | घनश्याम कडू |
काँग्रेसच्या उरण तालुका अध्यक्षपदी तरुण तडफदार विनोद म्हात्रे यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी आज विनोद म्हात्रे यांना नियुक्ती पत्र ही दिले. उरण तालुका अध्यक्षपदी विनोद म्हात्रे यांची निवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गेली अनेक वर्षे तालुका अध्यक्षपदाची धुरा जे. डी. जोशी सांभाळत होते. परंतु तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढताना दिसली नाही. यामुळे वरिष्ठांनी उरण तालुक्याची धुरा तरुण तडफदार विनोद म्हात्रे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. आज मुबंईत यावर शिक्कामोर्तब होऊन प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विनोद म्हात्रे यांना नियुक्तीपत्र दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, महिला नेत्या रेखा घरत, मुरलीधर ठाकूर, विनोद पाटील आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विनोद म्हात्रे यांची तालुका अध्यक्षपदी निवड जाहीर होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडणून आणण्यासाठी प्रयत्न करून तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी सांगितले.








Be First to Comment