Press "Enter" to skip to content

शेष फंडातुन स्टॅन्ड पोस्ट आणि शेडचे लोकार्पण

शेकाप जे काम करते त्याचे श्रेय शेकाप घेते :- चित्रलेखा पाटील

सिटी बेल | अलिबाग |

शेतकरी कामगार पक्ष हा जे काम करीत असतो त्याचे श्रेय घेत असतो असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख तथा अलिबाग नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील रामराज विभागात असणाऱ्या भिलजी येथे रायगड जिल्हा परिषदेच्या शेष फंडातुन स्टॅन्ड पोस्ट आणि शेडचे लोकार्पण कार्यक्रमात केले.

यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, शेतकरी कामगार पक्ष हा सर्व सामन्याचा पक्ष आहे.आपल्या पक्षाची नाळ ही तळागाळातील जनतेपर्यंत आहे.शेकाप नेते जो शब्द देताय तो कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करीत असतात.विरोधक फक्त स्वार्थासाठी आपली कामे करीत पोळी भाजण्याचे काम करीत असतात. शेकापमुळेच आज वाड्यावड्यामध्ये विकासकामे सुरू आहेत. जिल्हा परिषद तसेच भाई जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून कोट्यवधी रुपयांचा विकास कामे झाली असून विरोधक फक्त खोडा घालण्याचे काम करीत आहेत.ज्याप्रमाणे मुस्लिम सैनिकांना स्वप्नात सुद्धा संताजी धनाजी सारखे सूर लढवय्ये दिसायचे तसे विरोधकांना ध्यानीमनी आपला पक्ष दिसत आहे.

भिलजी येथे जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून स्टॅन्ड पोस्ट दुरुस्ती व शेड बांधण्याचे काम करण्यात आले आहे. यासाठी रु.2 लाख 98 हजार 322 इतका खर्च आला आहे.
यावेळी रामराज विभागातील असंख्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.