महाड मध्ये दिव्यांगांना आवश्यक साधन साहित्य वाटपासबंधी च्या शिबिराची सुरुवात
सिटी बेल | महाड |
महानगर गॅस लिमिटेड मुंबई यांच्या सी आर एस फंडातून व भारतीय कुत्रिम अंग निर्मान निगम (अलिम्को ) यांच्या मदतीने सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्र आणि श्री सर्मथ दिव्यांग कल्याणकारी संस्था यांच्या सहयोगाने दिव्यांगाना मोफत सहायक साधन वाटपासाठीचे तपासणी शिबीराच्या आयोजनांस रविवार दिनांक ०६/०२/२०२२ रोजी बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारका महाड येथे सुरवात झाली हा कार्यक्रम अजून दिनांक ७ व ८ /०२/२०२२ या दोन दिवस सुरू राहणार आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष साईनाथ पवार, रायगड जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, प्रहार संघटनेचे माणगाव तालुका अध्यक्ष संदीप खामगावकरआणि यांनी सदिच्छा भेट दिली आणि दिव्यांगाना मोलाचे मार्गदर्शन केले.

महाड तालुक्यातील दिव्यांगाना कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता आहे याची तपासणी करून सुमारे २०० दिव्यांगाची नोंदणी करण्यात आली आहे. असे सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्र चे सचिव शिवाजी पाटील आणि श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्था महाडचे सचिव अनिल जाधव खजिनदार मुबिन देशमुख यानी माहिती दिली.

या कार्यक्रमासाठी अलिम्को चे कमलेश यादव आणि त्यांची टीम, सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्र चे सचिव शिवाजी पाटील , श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी महाड यासंस्थेच्या अध्यक्षा दिप्ती शेडगे, सचिव अनिल जाधव, खजिनदार मुबिन देशमुख उपाध्यक्ष शैलेश बावळेकर, सदस्य सुरेश पाटील, अतिफ चाफेकर, विजय खोपकर, चंद्रकांत पालांडे, श्रीराम सकपाळ, सागर शेलार, दिगंबर पवार,मनोहर शिगवण, राजेंद्र शिंदे, मधुकर पोटे, सुरेश झोरे, मुकुंद येलकरआणि युवा संघर्ष संघटना महाडचे संकेत सकपाळ, यांच्या अथक प्रयत्नाने दिव्यांगाना मोफत साहयक साधन वाटपासाठीचे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर अजून दोन दिवस सुरू राहणार आहे असे सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था चे सचिव शिवाजी पाटील यांनी सांगितले.








Be First to Comment