Press "Enter" to skip to content

मिळकतखार, राजणखार डावली पाणी योजनेचे भूमिपूजन

पाण्यासाठी देखील राजकारण करणे हे शेकाप च्या जयंत पाटीलांचे काम : आमदार महेंद्र दळवी यांची टीका

सिटी बेल | अलिबाग |

पाणी योजना पूर्ण होऊ नये यासाठी हरकत घेत या विभागातील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे राजकारण शेकापचे जयंत पाटील यांनी केले आहे पाण्यासाठी राजकारण करीत राहणे
हा माझा धर्म नाही असे प्रतिपादन अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी मिळकतखार येथे जल जीवन मिशन अंतर्गत मिळकतखार आणि राजणखार डावली या योजनेच्या भूमिपूजन प्रसंगीं आयोजित कार्यक्रमात केले.

यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर,विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे,मुरूड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, मिळकतखार सरपंच गिरीश कडवे, रांजणखार डावली सरपंच हेमंत पाटील, महिला उपजिल्हा संघटक दर्शना पाटील, महिला आघाडी संपर्क संघटक शिल्पा घरत,गिरीश पाटील, जल जीवन मिशनचे अभियंता बिराजदार, कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले की, जयंत पाटील यांची सून चित्रा हिने व्हाट्सआप वर नागावं येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करण्यात आले असून तरुण खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात वाव मिळणार आहे.याबाबतची माहिती घेतली असता कोणीतरी पुनावाला आहे त्याच्याकडून सायकली भीक मागून घ्यायच्या आणि वाटप करायच्या.पुनावाला याच्या कार्यक्रमात घोषणा करताना काहीतरी तारतम्य बाळगले पाहिजे. लोकांना देता येत असेल तर द्यावे भीक मागून स्वतःचे मोठेपण कासाठी करायची.

नागरिक आता नेत्यापेक्षा हुशार झाले आहे.म्हणून त्यांनी मला आमदार केले आहे याची मला पूर्ण जाण आहे.गिरीश कडवे,गिरीश पाटील,आणि हेमंत पाटील यांनी पाण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे.याचे श्रेय मी आमदार म्हणून मला नाहीतर या तिघांना जात आहे.पाणी योजनेबाबत त्यांनी सुंदर काम केले आहे.गिरीश पाटील याने पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतःच्या मालकीची जागा दिली आहे.रांजणखार डावली सरपंच हेमंत पाटील आणि मिळकतखार सरपंच गिरीश कडवे यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली आहे म्हणून पाणी प्रश्न सुटला आहे.

खर सांगावे तर सदर योजना ह्या होऊ नये म्हणून जयंत पाटील यांनी सर्व प्रकारे प्रयत्न केले तसेच योजना पूर्ण होऊ नये यासाठी हरकतीसुद्धा घेतल्या आहे.या परिसरतील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवायचे आणि निवडणुका जवळ आल्या की,पाणी प्रश्न सोडविण्यासाठी फक्त आश्वासन द्यायचे असे राजकारण खेळायचे.पाण्यासाठी मी कधीही राजकारण केले नाही आणि कदापि करणारही नाही.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला तेव्हा साडे चार कोटींची पाणी पुरवठा योजना आली होती ती आजही अपूर्ण आहे.बोडणीतील ग्रामस्थांना आजपर्यंत पाणी मिळाले आहे का ?असा सवाल दळवी यांनी केला.सदर योजनेचे बिल जयंत पाटील यांनी खाल्ले.आज माझ्या यादीत दोन पाणी पुरवठा योजना आहे. व्यासपीठावर पाणी पुरवठा विभागाचे दोन अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत.

गिरीश पाटील हा आजही शेकाप चा सरपंच आहे.त्यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.जयंत पाटील यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी गुजरातमधील ठेकेदार आणला होता तोही बोगस निघाला.एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करीत स्वार्थ साधत आहे.मग जयंत पाटील ही मोठी असामी.त्यांच्याकडे पीएनपी जेट्टी,पीएनपी हायस्कूल, पीएनपी नाट्यगृह सारखे प्रकल्प आहेत.
पीएनपी नाट्यगृह हे अलिबाग शहरात होते.मात्र जयंत पाटील यांनी ते ग्रामीण भागात नेऊन त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा अनुदानही लाटले आहे.

माझ्या आमदारकीला सव्वा दोन वर्षे झाले असून अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावले आहे.मी जनतेमधून निवडून आलो आहे.येत्या नागपूर अधिवेशनात जयंत पाटील यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.