Press "Enter" to skip to content

गणेशोत्सवातून जागवीला गड किल्ल्यांचा इतिहास

शिवराज युवा प्रतिष्ठान सामाजिक संघटनेतर्फे माघी गणेशोत्सव साजरा

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण शहरातील शिवराज युवा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेतर्फे दरवर्षी माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाचे नियम पाळत सोशल फिजिकल डिस्टन्स पाळत मास्क व सॅनिटायजरचा वापर करत अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

संध्याकाळी 8 ते 10 दरम्यान किल्ला म्हणजे काय (किल्ल्याचे अंतरंग व वास्तूची ओळख )या विषयावर अपरिचित गडकोट शोध अभ्यासक, शिवभक्त जयकांत शिंक्रे (पालघर )यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

डिजिटल चलचित्राद्वारे पडद्यावर विविध किल्ले, किल्ल्याची ओळख अत्यंत उत्तम पद्धतीने जयकांत शिक्रे यांनी उपस्थितांना करून दिले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याच्या दृष्टीने व शत्रूवर विजय मिळविण्याच्या दृष्टीने बांधलेले हौद, कडे, तटबंदी, महादरवाजे, जंग्या, चिरेबंदी, टाके, तलाव, नगारवाडा, प्रवेश द्वारे, घोडे बांधण्यासाठी असलेला पागा,दारुगोळा शस्त्र ठेवण्यासाठी असलेला घर, धान्याचे कोठार,किल्ल्यावर बांधलेले घरे, दादर (पायऱ्या ),बुरुज, तोफखाना, गुहा, पायवाट, ढालकाठी, सदर, शिलालेख, भुयारी मार्ग आदी विविध वास्तू, गडकिल्यांचे अंतरंग याविषयी माहिती दिली.शिवभक्त तथा गडकिल्ले अभ्यासक जयकांत शिंक्रे यांनी वाणी आळी उरण शहर येथे शिवराज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात गणेशोत्सवातून गड किल्ल्यांचा इतिहास जागविला.

यावेळी शिवराज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश ठाकूर, कार्याध्यक्ष मंगेश वाजेकर, उपाध्यक्ष संगीता ढेरे, सरचिटणीस सचिन भोईर, खजिनदार उमेश वैवडे, सहचिटणीस योगेश म्हात्रे, सहखजिनदार पूजा प्रसादे,शिवराज युवा प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष धनंजय भोरे,राजेश सरफरे, दिनेश हळदणकर, सुभाष पाटील,सुभाष तांबे,दीपक प्रसादे,सचिन ढेरे,सुयोग ठाकूर,प्रशांत शिरधनकर, केशव निकम,वैदेही वैवडे,अनघा ठाकूर,सुप्रिया सरफरे,छाया तांडेल,अर्चना साळुंखे,सीमा निकम,विशाखा म्हात्रे आदींनी तसेच शिवराज युवा प्रतिष्ठान गड संवर्धन प्रमुख गणेश तांडेल, द्रोणागिरी गड संवर्धन प्रमुख गणेश माळी,सुजित खैरे ( डोबिवली), गणेश भोईर, वैभव भोईर, राजा नाईक, कौशिक म्हात्रे, यज्ञेश म्हात्रे ,प्रतीक , राज म्हात्रे, रवी म्हात्रे , लक्ष्मण कातकरी, प्रमोद दादा, किशोर दादा, विराज शिरधनकर , इतर गड संवर्धन टीमचे मावळे व सदस्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.