कर्करोग जनजागृती करण्यासाठी झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलने परिधान केला जांभळा रंग
सिटी बेल | मुंबई |
जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालयांद्वारे मुंबईत कर्करोग चर्चासत्र, तज्ञ डॉक्टरांची व्याख्याने आयोजित केली जातात. जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून घाटकोपर, मुंबई येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलने त्यांच्या संपूर्ण इमारतीला जांभळा रंग दिला आहे. झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कर्करोग उपचार उपलब्ध आहेत. भारतीय आरोग्य क्षेत्रात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चेन अशी शाल्बी समूहाची ओळख असून संस्थापक डॉ. विक्रम शाह हे प्रसिद्ध अस्थिव्यंगविशारदतज्ञ आहेत.
यावेळी भाष्य करताना झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे विक्री आणि विपणन प्रमुख आशिष शर्मा म्हणाले, “मुंबईकरांमध्ये कॅन्सरच्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आम्ही मोफत तपासणी शिबिरे, डॉक्टरांची व्याख्याने आणि इतर उपक्रमांचा समावेश केला आहे. आम्ही मुंबईतील एका गजबजलेल्या ठिकाणी म्हणजेच एलबीएस रोड, घाटकोपर येथे आहोत, म्हणून आम्ही ठरवले की आमच्या संपूर्ण इमारतीला हलका जांभळा रंग देण्यासाठी मुंबईकरांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची ही एक उत्तम संधी आहे.”
झायनोवाचे संचालक वसंत जाधव आणि झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे सीईओ रेनी वर्गीस यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण महिन्यात जागतिक कर्करोग दिनानिमित्त हॉस्पिटलमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.








Be First to Comment