साईनाथ पवार यांची मागणी ; ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
राज्यात दिव्यांग शिक्षकाच्या समस्या प्रलंबीत आहेत. त्याकडे शासन देखील लक्ष देत नसल्याने शासनाला स्मरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. दिव्यांग शिक्षणाची बदली करताना त्यात असलेल्या अटी दिव्यांग शिक्षकांना जाचक ठरत आहेत. त्यामुळे त्यांची बदली विनाअट करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार यांनी केली. याबाबतचे निवेदन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ याना देण्यात आले आहे.
जग आधुनिकतेकडे झुकले आहे. त्यामुळे आजकल बहुतेक सर्व व्यवहारव कामकाज हे ऑनलाईन स्वरुपात होते. मात्र रोष्टर अंतर्गत जिल्ह्यात अपंग शिक्षक जागा किती ? याबाबत आकडेवारी ऑनलाईन पोर्टल मध्ये माहिती भरले जात नाही. फक्त जातवार रिक्त संख्या भरले जात आहे.
त्यामुळे अपंग असून देखील संवर्ग १ मधून फॉर्म भरले तरी बदली होत नाही. एखाद्या अपंग व्यक्तीकडे नाहरकत दाखला असून सुद्धा त्यांना जर फॉर्म भरताना फक्त एकच एनओसी किंवा संवर्ग १ मधेच फॉर्म भरावा लागत असल्याने जर सिंगल एनओसी अंतर्गत जातवार अनुसरून जागा रिक्त नसल्यास बदली होत नाही म्हणून सिंगल एनओसी टॅबमध्ये अपंग हा सबटॅब द्यायला पाहिजे.किंवा अपंग टॅब मधेच एनओसी आहे की नाही याबाबत उल्लेख करण्याचा सोय द्यावी.
कन्नड रोस्टर पूर्ण नसल्याने सन २०१७ ते आज अखेर एकही कन्नड शिक्षक बदली झाले नाही ही बाब खूप गंभिर असून कन्नड शिक्षक अल्पसंख्याक असल्याने जिल्हा परिषद अधिकारी व ग्रामविकास विभाग आज अखेर केवळ मराठी रोष्टर पूर्ण होताच कन्नड वगळून बदली प्रक्रिया पार पाडली जात आहे. अपंग शिक्षकांचा बदल्या होत नाहीत त्याला कारण रोष्टर क्रमयादी मध्ये फक्त जातवार अनुसार रिक्त जागा दाखवले जातात, पूर्ण राज्यात अपंग रिक्त जागा किती याबाबत ऑनलाईन पोर्टलला माहिती भरत नसल्याने त्यांचा बदल्या होत नाहीत. म्हणून दिव्यांग शिक्षकांचा विनाअट किंवा स्वतंत्र बदली प्रक्रिया राबवल्या शिवाय पर्याय नाही.
तसेच दिव्यांग व एकच एनओसी धारक या दोन्ही अर्हता एकच शिक्षककडे असले तरी त्यांची बदली झाली नाही पण त्यांचा पेक्षा कनिष्ठ इतर शिक्षकाची बदली झाल्याचे दिसून आले आहे. कारण क्रमयादी अनुसार ओबीसी जागा रिक्त असणे. या संदर्भात दिव्यांग असल्याचा कोणत्याच लाभ बदली प्रक्रियेत मिळत नसल्याचे चित्र आहे. तेव्हा दिव्यांग शिक्षकांच्या बदली प्रकीये तीन वर्षाची अट शिथील करण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.








Be First to Comment