Press "Enter" to skip to content

समुद्र किनार्यावर दारूड्यांचा धिंगाणा

मुरुड समुद्र किनारी मद्यपान करून दंगा मस्ती करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

सिटी बेल | मुरूड | अमूलकुमार जैन |

रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनारी संदीप उमाजी भालके (वय २९वर्षे ),प्रतीक प्रकाश पाटील (वय २९वर्षे ),मंगेश दिनेश ठाकूर (वय ३४वर्षे ),सर्व राहणार-साई, तालुका-माणगाव,जिल्हा-रायगड हे मद्यपान करून दंगा मस्ती करीत असल्याने त्यांच्या विरोधात मुरुड पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार दीपक रघुनाथ राऊळ (वय ५६वर्षे,राहणार-मुरुड पोलीस ठाणे ) यांनी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दीपक रघुनाथ राऊळ हे पोलीस शिपाई प्रशांत लोहार यांच्यासह मुरुड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलीस गस्त करीत असताना मुरुड समुद्र किनारी असणारा जीवरक्षक सुयोग सरपाटील याने फोन करून कळविले की,मुरुड समुद्र किनारी संदीप उमाजी भालके,प्रतीक प्रकाश पाटील,मंगेश दिनेश ठाकूर हे तीन पर्यटक आपसात दंगा मस्ती करीत आहेत.

त्यानुसार दीपक राऊळ आणि पोलीस शिपाई लोहार यांनी मुरुड समुद्र किनारी जाऊन पाहिले असता,संदीप उमाजी भालके, प्रतीक प्रकाश पाटील,मंगेश दिनेश ठाकूर हे तिघेजण सार्वजनिक स्थळी मद्यपान करून आपसात झुंज करून जोरजोरात आरडाओरडा करून मारामारी करीत असताना मिळून आले.

याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वाघमारे हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.