शेडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज हाॕस्पिटलचा स्थानिकांनी फायदा घ्यावा – दिपक कांबळी
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनीतील मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी यांनी शेडुंग टोलनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज हाॕस्पिटलला भेट देऊन हाॕस्पिलच्या सी.एम.डी.माधवी जोशी,एम.डी.जयदास जाधव,विपिन थाॕमस,जयवंत दळवी व सदानंद शेडगे यांच्या समवेत चर्चा करून हाॕस्पिटलची माहिती घेतली.
या रुग्णालयात इमरजेंसी सेवा,अत्याधूनिक आॕपरेशन थिएटर, मोठ्याचे व लहानांचे आय.सी.यु चोवीसतास अपघात व तातडीचे उपचार,अनुभवी डाॕक्टर व नर्सिंग स्टाफ, सुसज्ज रक्त तपासणी सेंटर ,हाडांचे अपघात व विकार ,स्री- रोग आणि ,लहान मुलांचे उपचार ,एक्स – रे आणि सोनोग्राफी सेंटर,रोज सर्व निष्णात डाॕक्टरांची ओ.पी.डी.तसेच बी.पी.शुगर थायराॕइड, लीव्हर ,आतड्यांची सूज,दमा, एलर्जी, लाकवा,मिर्गी (फीट) तसेच अॕपेडीक्स, हार्निया,पाईल्स, फिशर, फिस्टुला, किडनी स्टोन ,गाठी वरील उपचार यांची सर्जरी वंध्यत्व वर उपचार ,नाॕरमल व सिजेरीयन डिलेव्हरी इत्यादी प्रकारच्या अनेक सुविधा या एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.
तसेच रुग्णांना व त्यांच्या बरोबर असलेल्या नातेवाईकाला नाष्टा व जेवण पूरविले जाते.
पनवेल,नवी मुंबई येथील उपचारांच्या खर्चापेक्षा अत्यंत अल्पदरात येथे उपचार होतात. तरी परिसरातील जनतेने याचा फायदा घ्यावा असे आवाहन दिपक कांबळी यांच्या वतीने करण्यात आले.








Be First to Comment