सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती तसेच ज्ञानवर्धिनी विद्यालय सावळेचे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य गजानन माळी यांचा वाढदिवस साधेपणाने उत्साहात साजरा करण्यात आला . तसेच यावेळी आंबरे सर यांची के.आ.बांठीया विद्यालय नवीन पनवेल येथे बदली झाल्या निमित्त त्यांचा निरोप समारंभ स्कूल कमिटीतर्फे साजरा करण्यात आला .
यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य काशिनाथ कांबळे , सुनील माळी , श्रीमती कल्पनाताई माळी , सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत माळी , सुदर्शन मते , विद्यालयाचे मुख्याध्यापक घोडके सर्व शिक्षक व सर्व कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन वावेकर , अमृते , सय्यद , सौ . शेलार यांनी केले .








Be First to Comment