कर्जत तालुक्यातील कळंबोली, सालवड आदिवासी वाडी येथे ब्रम्हगुरु फाऊंडेशन मार्फत 200 ब्लॅंकेटचे वाटप
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुक्यातील कळंबोली, सालवड आदिवासी वाडी येथे आदिवासी बांधवांना ब्रम्हगुरु फाऊंडेशन मार्फत 200 ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील कळंबोली, सालवड आदिवासी वाडी येथे आदिवासी बांधवांना माघी गणेश उत्सवाच्या निमित्ताने ब्रम्हगुरु फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत शिंदे, ट्रस्टी ब्रिजेश सिंग, कॅप्टन अंशु अभिषेक, प्रशांत सिंग, सत्यम सिंग यांच्या मार्फत ब्लँकेट वाटण्यात आले.या प्रसंगी युवासेना कर्जत तालुका सचिव कर्तव्य दक्ष समाजसेवक अॅड.संपत हडप, ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर सरपंच साक्षी संतोष मोहिते, सदस्या शैला हिलम, समाजसेवक दशरथ देशमुख, उपस्थित होते.

आदिवासी बांधवांना अनेक सुखसुविधा मिळाव्या हा मुख्य उद्देश या संस्थेचा असून त्यासाठी ही संस्था कार्य करत आहे. आदिवासी बांधवांचे थंडी पासून रक्षण होण्यासाठी संस्थेमार्फत आज 200 ब्लँकेट वाटप करण्यात आले. चिंचवली – गणेगाव येथे गरजू व्यक्तींना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. ब्रम्हगुरु फाऊंडेशन चे सहकारी कॅप्टन अंशु अभिषेक, संस्थापक आदित्य दृष्टी सामाजिक विकास प्रतिष्ठान संस्थेचा देखील उद्देश सामाजिक व धार्मिक कार्य करणे हा असून बाळ आश्रमाचे बांधकाम, बेरोजगार, गरीब, असहाय्य महिलांना प्रशिक्षित करून लघुउद्योगाद्वारे रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. ग्रामपंचायत विभागात ते यासाठी प्रशिक्षण शिबीर देखील लवकरच घेणार आहेत.








Be First to Comment